नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. पहिल्याच दिवशी काल विरोधी पक्षांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला. आज या अविश्वास प्रस्तावर चर्चा करण्यात येणार असून मतदान केले जाणार आहे.
देशात मॉब लिंचिंग (जमावाकडून मारहाण) सारख्या घटना वाढत आहेत. यावरुन विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. सरकारकडून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेवर स्पष्टीकरण दिले. यावेळी मॉब लिंचिगच्या घटनांचा निषेध करत राजनाथ सिंह म्हणाले की, देशात सरकारच्या आधीपासून मॉब लिचिंगसारख्या घटना घडत आहेत. यावर, काँग्रेसच्या खासदारांनी नाराजी व्यक्त करत लोकसभेतून वॉकआउट केले.
देशात मॉब लिंचिंगमुळे अनेक लोकांनी हत्या झाली असून अनेक जण जखमी झाले आहेत. याविषयाकडे गंभीरस्वरुपात पाहिले जात असून सरकारकडून अशा घटनांचा निषेध करण्यात येत आहे. सर्वांना माहीत असलेल पाहिजे की, अशा घटना अफवा आणि चुकीच्या बातम्यांमुळे घडत असतात. त्यामुळे मॉब लिंचिंग सारख्या घटना रोखण्याची जबाबदारी राज्यांची आहे, असे राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.