उघड्यावर शौचास बसणार्यांविरुध्द कारवाई
By admin | Published: March 23, 2017 5:15 PM
जळगाव: उघड्यावर शौचास बसणार्या सालारनगर व खेडीच्या १२ जणांविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला बुधवारी गुन्हे दाखल करण्यात आले.
जळगाव: उघड्यावर शौचास बसणार्या सालारनगर व खेडीच्या १२ जणांविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला बुधवारी गुन्हे दाखल करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव महानगरपालिकेतर्फे उघड्यावर शौचालयास बसणार्यांविरुध्द कारवाईची मोहीम उघडण्यात आली आहे. मनपा आरोग्य निरीक्षक एन.ई.लोखंडे यांच्या पथकाने बुधवारी सकाळी साडे सात वाजता मोहीम राबविली. युनिट क्रमांक १३ मधील सालारनगर पुलाजवळ तसेच खेडी गावालगत १२ जण उघड्यावर शौचास बसलेले आढळून आले. या सर्वांना टमरेलसह पोलीस स्टेशनला नेण्यात आले. यांच्यावर गुन्हा दाखलबाबुराव मगन पांचाळ (वय ३३), ज्ञानेश्वर एकनाथ पांचाळ (वय २६ ), निलेश सुकदेव कदम (वय ३९), मन्साराम झांबर मराठे (वय ३८), शंकर बादल राठोड (वय ३१), सोमवीर कश्यप (वय २५), बंटी श्रीराम कश्यप (वय २६), भास्कर शिवलाल घाटोळे (वय ५८), मधुकर भगवान इंधे (वय ४६), आत्माराम कौतिक साळुंखे (वय ६५), अरुण वसंत भालेराव (वय ४२), प्रवीण सुरेश राऊत (वय २४) यांच्यावर मुंबई पोलीस अधिनीयम १९५१ मधील कलम ११५,११७ नुसार कारवाई करण्यात आली.