सटाणा : शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून गर्दीच्या ठिकाणी नागरिक काळजी घेत नसल्याचे निदशर्नास येत आहे . त्यामुळे शहरात आता मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे . विनामास्क फिरणा?्यांवर कारवाई दुकानदारांनीही शारीरिक अंतर ठेवून हँडग्लोज , सॅनिटायझर व मास्क बंधनकारक केले आहे . जे नागरिक व दुकानदार नियमांचे पालन करणार नाही , त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल केले जातील , अशी माहिती मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी दिली . त्या म्हणाल्या , की बागलाण तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला असून , सटाणा शहरातही दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची वाढत असलेली संख्या चिंताजनक आहे . या पाश्वर्भूमीवर पालिका प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत .मास्क नाही , तर माफी नाही ; दंड भरावाच लागणार शहरात शासनाच्या निर्देशानुसार ' माझे कुटुंब - माझी जबाबदारी ' ही मोहीम हाती घेण्यात आली असून , मोहिमेच्या यशस्वितेसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे . कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरात मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले असून , मास्क न वापरणा?्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे . दुकानात किंवा दुकानाबाहेर अनावश्यक गर्दी आढळून आल्यास दुकानदाराविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील .माझे कुटुंब, माझी जबाबदारीमाझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत घरोघरी सर्वेक्षणास येणाºया सर्वेक्षकास आवश्यक माहिती देण्यास टाळाटाळ करणाºया व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल . ज्या व्यक्तींना कोरोनासदृश लक्षणे आढळून येत असतील , अशा नागरिकांनी तत्काळ ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधावा अथवा सर्वेक्षकास माहिती द्यावी . त्यामुळे संबंधित व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांची योग्य काळजी घेऊन त्यांच्यावर वेळीच उपचार केले जातील . नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहनही डगळे यांनी केले .