नासुप्रच्या पाच अनधिकृत दुकानांवर कारवाई
By admin | Published: January 30, 2015 9:11 PM
नासुप्रच्या पाच अनधिकृत दुकानांवर कारवाई
नासुप्रच्या पाच अनधिकृत दुकानांवर कारवाई नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मानेवाडा व बेसा रोडवर एका इमारतीमधील अनधिकृत दुकानांसह एका डॉक्टरचे अतिरिक्त बांधकाम तोडण्याची कारवाई केली. पथकातील अधिकाऱ्यांनुसार नागपूर नगर विकास गृह निर्माण सहकारी संस्थेच्या प्लॉट क्रमांक ३ वर बिल्डर इंगळे याने तीन माळ्याची इमारत बांधली. या इमारतीच्या पहिल्या माळ्यावर तीन दुकानांचेअनधिकृत बांधकाम केले. तसेच तळ मजल्यावरील मोकळ्या जागेत सुद्धा दोन दुकानांचे बांधकाम केले होते. पथकाने शुक्रवारी कारवाई करून पहिल्या माळ्यावरील तीन दुकनांचे शटर तोडले. तसेच तळमजल्यावरील दुकानांचे शटर सुद्धा तोडले. यानंतर बिल्डरतर्फे रिव्हाईज प्लॅनसाठी अर्ज करण्याची मागणी केली असता ५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दंडात्मक कारवाईनंतर बिल्डरला सवलत देण्यात आली. दुसरी कारवाई मानेवाडा येथील खसरा क्रमंक ७६/३ नरहरी गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या ले-आऊटवर करण्यात आली. तिथे प्लॉट क्रमांक ८ वर डॉ. संुभ नावाच्या इमारतीच्या मालकाने मंजूर प्लॅनपेक्षा अतिरिक्त बालकनी व जिना निर्माण केला होता. त्याला तोडण्याची कारवाई करण्यात आली. सोबतच २ लाख रुपयांचा दंड सुद्धा ठोठावण्यात आला. तिसरी कारवाई मौजा सक्करदरा परिसरात करण्यात आली. खसरा क्रमांक ५३/१ रामसिंह ठाकूर ले-आऊट मधील प्लॉट नंबर ५३/अ वर शेळके परिवारने एका माळ्याच्या इमारतीचे काम विना परवानगी केले होते. यासंबंधात त्यांच्या शेजारी राहणारे सेवानिवृत्त तहसीलदारने नासुप्रकडे तक्रार केली होती. लोकशाही अदालतीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अवैध बांधकाम तोडण्याचे निर्देश जारी केले होते. या निर्देशानुसार शुक्रवारी कारवाई करण्यात आली. ही कारवाई विभागीय अधिकारी प्रमोद धनकर, मनोहर पाटील, भीमराव देशपांडे, महेश चौधरी यांनी केली.