नितीन अग्रवाल, नवी दिल्लीपोलीस, सुरक्षा संस्था (एजन्सीज) आणि अधिकारी पदांवर राहिलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी सेवानिवृत्तीनंतर सरकारी सोयी-सवलती-सुविधा घेणे थांबवले नाही, तर मोठी किमत मोजावी लागेल. अशा अधिकाऱ्यांकडून सरकार लवकरच या सोयी-सुविधांची किंमत वसूल करणार आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्रालयाने राज्य सरकारांकडून सेवानिवृत्तीनंतरही सरकारी सोयी-सुविधांचा ताबा सोडलेला नाही, अशा अधिकाऱ्यांची माहिती मागवली आहे. अशा सेवानिवृत्तांवर कारवाई तर होईलच, पण अशी कारवाई करण्यात हलगर्जी करणाऱ्यांवरही कारवाई होईल. गेल्या वर्षी २१ सप्टेंबर रोजी गृहमंत्रालयाने राज्य सरकारांना याबाबत आदेश दिले होते. त्यात म्हटले होते की, सेवानिवृत्तीनंतर सुरक्षा दलांच्या प्रमुखांनी सरकारी सोयी-सुविधा घेऊ नयेत. केंद्र आणि राज्याच्या पातळीवर अनेक अधिकारी सेवानिवृत्तीनंतरही सरकारी वाहन, सुरक्षा आणि घरकामाला नोकराचा वापर करतात. यामुळे जनतेत चुकीचे संदेश जातात व सरकारी नोकरीच्या नियमांचेही उल्लंघन होते. सेवानिवृत्त होताच सरकारी अधिकाऱ्याने एक महिन्याच्या आत सगळ््या सरकारी सवलती, सोयी सोडून दिल्या पाहिजेत.
निवृत्तीनंतरही सुविधा घेणाऱ्यांवर कारवाई
By admin | Published: January 02, 2017 1:16 AM