अल्पवयीन दुचाकीस्वारांवर आजपासून कारवाई
By admin | Published: February 07, 2016 11:13 PM
जळगाव: हेल्मेट न वापरणार्या दुचाकीस्वारांवर कारवाईची मोहीम कायम ठेवतानाच दुचाकी चालविणार्या अल्पवयीन मुल-मुलींवरही सोमवारपासून शहर वाहतूक शाखेतर्फे कारवाईची मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी दिली. शनिवारी महामार्गावर हेल्मेट न वापरणार्या १२० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
जळगाव: हेल्मेट न वापरणार्या दुचाकीस्वारांवर कारवाईची मोहीम कायम ठेवतानाच दुचाकी चालविणार्या अल्पवयीन मुल-मुलींवरही सोमवारपासून शहर वाहतूक शाखेतर्फे कारवाईची मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी दिली. शनिवारी महामार्गावर हेल्मेट न वापरणार्या १२० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.सायकलस्वार बालकाला दुचाकीची धडकजळगाव: आकाशवाणी चौकातील सिग्नलवर भरधाव वेगाने जाणार्या दुचाकीस्वाराने (क्र.एम.एच.१९ बी.डब्लू ३०३५) सायकलस्वार बालकाला रविवारी रात्री साडे आठ वाजता धडक दिली. त्यात बालकाला किरकोळ खरचटले आहे तर सायकलचे मात्र जास्त नुकसान झाले आहे. सिग्नल सुरु असताना हा बालक रस्त्यात आल्याचे दुचाकीस्वाराचे म्हणणे होते. दुचाकीस्वार तरुणाच्या वडीलांनी नुकसान भरपाई मागणार्या बालकालाच खडे बोल सुनावले. यावेळी मोठी गर्दी झाल्याने जिल्हा पेठचे कॉन्स्टेबल संजय पाटील यांनी भेट देवून हा वाद मिटवला.