Love Jihad : लग्न लावून देणाऱ्या मौलवी-पुजाऱ्यावर होणार कारवाई, मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी केले भाष्य

By पूनम अपराज | Published: December 26, 2020 07:54 PM2020-12-26T19:54:56+5:302020-12-26T19:55:33+5:30

Love Jihad : ते म्हणाले की, मौलाना, मौलवी किंवा पुजारी धर्म परिवर्तन करून लग्न लावून देत असतील, तर त्यांना शिक्षेस पात्र ठरवले जाईल.

Action will be taken against the maulavi-priest who arranged the marriage, commented the Home Minister of Madhya Pradesh | Love Jihad : लग्न लावून देणाऱ्या मौलवी-पुजाऱ्यावर होणार कारवाई, मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी केले भाष्य

Love Jihad : लग्न लावून देणाऱ्या मौलवी-पुजाऱ्यावर होणार कारवाई, मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी केले भाष्य

googlenewsNext
ठळक मुद्देपुजारी, मौलवी दोषी आढळल्यास शिक्षेची तरतूद आहे. पुढे ते म्हणाले की, अशा प्रकारे सक्तीने केलेले लग्नाला शून्य महत्व असेल. जर अशा लग्नाला शून्य घोषित केले गेले, तर आई आणि तिची मुले असल्यास तीही वडिलोपार्जित मालमत्तेत हक्क म्हणून गणली जातील.

मध्य प्रदेशनेहीलव्ह जिहादसंदर्भात नवा कायदा बनविला आहे. मध्य प्रदेशात त्याला शिवराज यांच्या मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली आहे. मध्य प्रदेशच्या नवीन कायद्यात १९ तरतुदी आहेत. नव्या कायद्याबद्दल आज तकशी बोलताना गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले आहेत की, आम्ही मध्य प्रदेशात देशातील सर्वात मोठा कायदा बनविला आहे. ते म्हणाले की, मौलाना, मौलवी किंवा पुजारी धर्म परिवर्तन करून लग्न लावून देत असतील, तर त्यांना शिक्षेस पात्र ठरवले जाईल.

नरोत्तम मिश्रा म्हणाले की, या कायद्यात दहा वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. अशा विवाहसोहळ्यांना प्रोत्साहित करणार्‍या संस्थांची नोंदणी रद्द केली जाईल. पुजारी, मौलवी दोषी आढळल्यास शिक्षेची तरतूद आहे. पुढे ते म्हणाले की, अशा प्रकारे सक्तीने केलेले लग्नाला शून्य महत्व असेल. जर अशा लग्नाला शून्य घोषित केले गेले, तर आई आणि तिची मुले असल्यास तीही वडिलोपार्जित मालमत्तेत हक्क म्हणून गणली जातील.


मध्यप्रदेशचे गृहमंत्री म्हणाले की, या प्रकरणी तपास ठाणेदार किंवा त्याच्यापेक्षा उच्च स्थरीय दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाईल.  धर्म स्वातंत्र्य विधेयक 2020  मध्ये 25 आणि 50 हजार, एक लाख रुपयांच्या दंड रकमेचे तीन टप्प्यांत दंड लावण्यात आला आहे.  दंडाची रक्कम इतकी जास्त का आहे? या प्रश्नाला उत्तर देताना नरोत्तम मिश्रा म्हणाले की, भीती निर्माण व्हावी म्हणून रक्कम वाढवली आहे. यूपी कायद्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, आम्ही कोणाशीही तुलना करत नाही. हा देशातील सर्वात कठोर कायदा आहे. सरकार या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करेल.

नरोत्तम मिश्रा म्हणाले की, देशातील कोणत्याही राज्यातील कोणतेही सरकार असा कायदा आणल्यास आम्ही त्याचे स्वागत करू. पुढे ते म्हणाले की, जे लोक कोणत्याही धर्मातील मुलीला मोहात पाडून त्याचे धर्मांतर करून लग्न करतात त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्याची तरतूद आहे. या विधेयकाद्वारे धर्म स्वातंत्र्य विधेयक 1968 निष्क्रिय मानले जाईल. लव्ह जिहादसंदर्भात एका प्रश्नाला उत्तर देताना नरोत्तम मिश्रा म्हणाले की, कोण काय म्हणतो, हा वेगळा विषय आहे. जो कोणी एखाद्याशी भुरळ घालून, जबरदस्तीने किंवा नशाच्या अवस्थेत एखाद्याशी लग्न करेल तो शिक्षेस पात्र ठरेल.

Web Title: Action will be taken against the maulavi-priest who arranged the marriage, commented the Home Minister of Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.