ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - आयएसआयएस आणि पाकिस्तानचे झेंडे फडकवणाऱ्यांना देशद्रोह्यांसारखीच वागणूक देऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेत दहशतवादी हल्ला झाल्यावर दहशतवाद्यांना साथ देणाऱ्या तसेच लष्करी कारवाईत अ़डथळा आणणाऱ्यांनाही दहशतवाद्यांचे सहकारी समजण्यात येईल, असा कठोर इशारा आज लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दिला आहे.
मंगळवारी दशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत हौतात्म्य आलेल्या जवानांना श्रद्घांजली दिल्यानंतर दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींना इशारा दिला. गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यावर त्यांना प्रत्युत्तर देणाऱ्या जवानांवर स्थानिकांकडून दगडफेक करण्यात येत असल्याचे, तसेच कारवाईत अडथळा आणण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दहशतवाद्यांना पळून जाण्यास मदत मिळत आहे.
If locals who want to continue with terror by displaying flags of ISIS&Pak then we'll treat them as anti nationals&will not spare them: COAS pic.twitter.com/2Bk0LNV08I— ANI (@ANI_news) February 15, 2017