शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
5
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
6
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
7
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
8
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
9
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
12
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
13
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
14
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
15
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
16
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
18
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
19
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
20
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात

ट्रेन उशिरानं सुटल्यास अधिका-यांवर होणार कारवाई- सुरेश प्रभू

By admin | Published: April 18, 2017 6:18 PM

ट्रेनला सुटण्यासाठी उशीर झाल्यास अधिका-यांवर कारवाई करण्याचे सूतोवाच सुरेश प्रभूंनी केले आहेत.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 18 - गेल्या काही दिवसांपासून ट्रेन उशिरानं सुटण्याचे प्रकार वाढत आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे अनेक प्रवाशांनी ट्रेनच्या अनियमित वेळापत्रकासंदर्भात वारंवार तक्रारी आणि नाराजी व्यक्त केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर ट्रेनला सुटण्यासाठी उशीर झाल्यास अधिका-यांवर कारवाई करण्याचे सूतोवाच सुरेश प्रभूंनी केले आहेत. ट्रेन वेळेत सोडा अन्यथा कारवाईसाठी तयार राहा, असा सल्लावजा इशाराच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अधिका-यांना दिला आहे. प्रभूंच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी रेल्वेच्या विभागीय प्रमुखांनी रात्री 10 ते सकाळी 7 या वेळेत वरिष्ठ पातळीवरील अधिका-यांची नेमणूक करत कामाची वेळ ठरवून दिली आहे. रात्रीच्या वेळेस एखाद्या ट्रेनला उशीर होत असल्यास संबंधित परिस्थितीवर नजर ठेवत वरिष्ठ पातळीवरील अधिका-यांनी ती ट्रेन वेळेत सुटेल, याची काळजी घ्यावी, असंही विभागीय प्रमुख म्हणाले आहेत. भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर राष्ट्रीय रेल्वे चौकशी प्रणाली(एनटीईएस)नं उशिरा सुटणा-या रेल्वेच्या टाकलेल्या वेळापत्रकाची रेल्वेमंत्री स्वतः दखल घेत आहेत. त्यामुळे प्रवाशांना वेळेत ट्रेन सुटण्याचा अनुभव घेता येत आहे. 1 एप्रिल 2017 ते 16 एप्रिल 2017 या कालावधीत अनेक ट्रेन्सचे वेळपत्रक 79 टक्के विस्कळीत झाल्याचं समोर आलं आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत याच कालावधीत 84 टक्के ट्रेनच्या वेळपत्रकात बिघाड झाला होता. मात्र हे प्रमाण काही प्रमाणात घसल्याचंही समोर आलं आहे.