नवी दिल्ली - उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भ्रष्टाचारविरोधात मोठी कारवाई करण्याच्या निर्णय घेतला आहे. योगींनी भष्ट्राचाराचे आरोप असलेल्या ६०० अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यात सर्वाधिक आईएएस व आईपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांची यादी केंद्रसरकारकडे पाठवण्यात आली आहे.
योगी सरकारने भष्ट्राचार करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कडक पाऊल उचले आहे. 600 अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. यात 200 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांना सक्तीच्या सेवानिवृत्ती देण्यात येणार आहे. तर 400 अधिकाऱ्यांना दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यात सर्वाधिक आईएएस व आईपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्य सरकारला अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या अधिकार नसल्याने त्यांची यादी केंद्रसरकारकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती, राज्य सरकारचे प्रवक्ता श्रीकांत शर्मा यांनी दिली आहे.
जनतेच्या आलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा याआधीच सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे कारवाईनंतर या अधिकाऱ्यांच्या बढती थांबवली जाणार असून त्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. तर श्रीकांत शर्मा यांनी सांगितले की ही पहिली अशी सरकार आहे ज्यांनी 600 हून अधिक अधिकाऱ्यांविरोधात एकाचवेळी भष्ट्राचाराच्या आरोपात कारवाई केली आहे.