नंदकिशोर पुरोहितकणोदर (पालनपूर) : गुजरातमधील नवोदित दलित नेते जिग्नेश मेवानी हे वडगाम मतदारसंघातून निवडणूक लढत असून, त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील अनेक भागांतून लोक आले आहेत.पुण्यात ट्रॅव्हल एजन्सी चालविणारे अभिजित मंगल कणोदरला पोहोचले. त्यांनी सांगितले की, आम्ही जिग्नेश यांना पुण्यात एका कार्यक्रमासाठी बोलावले होते, तेव्हाच त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला होता. हार्दिक यांच्या बडोद्यातील रॅलीसाठी आम्ही सात जण पुण्यातून आलो होतो. रॅली रद्द झाली. मग आम्ही जिग्नेश यांच्या प्रचारात गुंतलो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून निवृत्त झालेले सामाजिक कार्यकर्ते प्रवीण सप्तर्षी आणि त्यांची पत्नी रमा यांनी सांगितले की, असंघटित वर्गाला संघटित हुकूमशाहीविरुद्ध एकजूट करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. बदलापूर येथील निवृत्त शिक्षक उमेश भोयर यांनी सांगितले की, राजकारणात धमक्यांची प्रवृत्ती वाढली आहे. त्याविरुद्ध लढण्यासाठी मी येथे आलो आहे.कल्याण येथून आलेले चित्रपट संपादक विराज झुंजारराव यांनी म्हटले की, या काळात जिग्नेशसारखे तरुणच समाजासाठी आशेचा किरण आहेत.
गुजरातमध्ये प्रचाराला महाराष्ट्रातील कार्यकर्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 2:41 AM