नवी दिल्ली - दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी रामलीलेसंदर्भात केलेल्या एका वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. प्रकाश राज यांचा भारताच्या संस्कृतीवर भाष्य करणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, या व्हिडीओमधून ते रामलीलेची तुलना चाइल्ड पॉर्नशी करताना दिसत आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ 2018 मधील असून, योगी आदित्यनाथ यांच्याकडून रामलीलेच्या होत असलेल्या प्रचार प्रसारावर टीका करताना त्यांनी हे वक्तव्य केल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून प्रकाश राज यांच्यावर सोशल मीडियामधून जोरदार टीका होत आहे. प्रकाश राज म्हणतात, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे रथोत्सवात सहभागी होणे थोडे विचित्रच वाटते. मुख्यमंत्री म्हणून हे योग्य वाटते का? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे धार्मिक उत्सवात सहभागी होणे हा केवळ एक दिखावा आहे. खरंतर या माध्यमातून अल्पसंख्याकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरवणे हा खरा हेतू आहे. ''रामलीलेसारखे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम या देशात आयोजित होता कामा नयेत, रामलीला ही चाइल्ड पॉर्नसारखी आहे, असेही प्रकाश राज यावेळी म्हणाले. ''मुलांनी चाइल्ड पॉर्न पाहिल्यास तुम्ही त्याला विचारणार नाही का? तुम्ही त्यांना तसेच सोडणार का? रामलीला ही समाजासाठी चांगली नाही. रामलीलेसारखे कार्यक्रम समाजाचे नुकसान करतात. त्या माध्यमातून अल्पसंख्याकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे, असेही त्यांनी सांगितले. संस्कृती काय आहे आणि काय नाही हे मी चांगले जाणतो. पण राम, लक्ष्मण आणि सीतेला हेलिकॉप्टरमधून आणणे आणि खाली उतरवणे ही माझी संस्कृती नाही, हे मला अवश्य माहिती आहे, असेही त्यांनी सांगितले.
हे राम! अभिनेते प्रकाश राज यांनी चाइल्ड पॉर्नशी केली रामलीलेची तुलना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 6:18 PM
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी रामलीलेसंदर्भात केलेल्या एका वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले आहे.
ठळक मुद्देरामलीलेसारखे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम या देशात आयोजित होता कामा नयेत, रामलीला ही चाइल्ड पॉर्नसारखी आहेरामलीलेसारखे कार्यक्रम समाजाचे नुकसान करतात. त्या माध्यमातून अल्पसंख्याकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होत आहेसंस्कृती काय आहे आणि काय नाही हे मी चांगले जाणतो. पण राम, लक्ष्मण आणि सीतेला हेलिकॉप्टरमधून आणणे आणि खाली उतरवणे ही माझी संस्कृती नाही