चंदिगढ: सामाजिक कार्यामुळे सातत्यानं चर्चेत असलेल्या अभिनेता सोनू सूदचीभारतीय निवडणूक आयोगानं पंजाबचा स्टेट आयकॉन म्हणून निवड केली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. एस. करुणा राजू यांनी याबद्दलची माहिती दिली. पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून सूद यांचं नाव सुचवण्यात आलं होतं. त्या प्रस्तावाला निवडणूक आयोगानं मंजुरी दिली आहे.जनतेमध्ये मतदानाबद्दल जागरुकता निर्माण करण्याचं काम सोनू सूद पंजाबमधील निवडणूक कार्यालयाच्या मदतीनं करेल. सोनू सूद गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं गरजवंतांना मदत करत आहे. त्याच्या याच कार्याचा विचार करून स्टेट आयकॉन म्हणून त्याची निवड करण्यात आली. सोनू पंजाबच्या मोगा जिल्ह्याचा मूळ रहिवाशी आहे. त्यानं आतापर्यंत हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि पंजाबी भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
सोनू सूद आता मतदानाबद्दल जनजागृती करणार; पंजाबसाठी 'आयकॉन' म्हणून निवड
By कुणाल गवाणकर | Published: November 16, 2020 11:08 PM