शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
3
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
4
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
5
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
6
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
7
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
8
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
9
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
10
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
11
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
12
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
13
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
14
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
15
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
16
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
17
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
18
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती
19
काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर
20
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा

अभिनेत्री आमरीनच्या मारेकऱ्यांना कंठस्नान, 4 दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 11:26 AM

सुरक्षा दलांकडून काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा

सुरेश डुग्गरलाेकमत न्यूज नेटवर्कजम्मू : काश्मीरमधील प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आमरीन भट्ट यांची दाेन दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली हाेती. त्यांच्या मारेकऱ्यांना ४८ तासांमध्ये सुरक्षादलांनी यमसदनी धाडले आहे. सुरक्षादलांनी मुश्ताक भट्ट आणि फरहान हबीब अशी ठार मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. लष्कर-ए-ताेयबाचा कमांडर लतीफ याच्या इशाऱ्यावरून आमरीन यांची हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. 

गेल्या २४ तासांमध्ये सुरक्षादलांनी वेगवेगळ्या चकमकींमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. चाैघेही ‘लष्कर’चे सदस्य हाेते. काश्मीरचे पाेलीस महानिरीक्षक विजयकुमार यांनी यासंदर्भात सांगितले, की बडगाममधील चाडुरा भागात मुश्ताक आणि फरहान हे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली हाेती. त्यांना आत्मसमर्पणाची पूर्ण संधी देण्यात आली हाेती. दोघांनी आमरीन यांच्यावर त्यांच्या घरासमोरच गोळीबार केला होता. तर, साैरा भागातही चकमकीत आणखी दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. 

गेल्या पाच महिन्यांत १५ जवान शहीदगेल्या जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांत १५ नागरिकांचा मृत्यू झाला, तर सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकींमध्ये १५ जवान शहीद झाले आहेत. येत्या ३० जूनपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार आहे. त्यात सहभागी होणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी या मार्गावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. काश्मिरी पंडित राहुल भट्ट, अभिनेत्री अमरीन भट्ट यांच्या हत्येमुळे हे स्पष्ट झाले की, दहशतवादी काश्मिरी पंडित व नामवंत लोकांना लक्ष्य करत आहेत.

यंदाच्या वर्षी ८८ दहशतवाद्यांचा खात्माकाश्मीरमध्ये यंदाच्या वर्षी सुरक्षा जवानांनी ८८ दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यामध्ये ३० विदेशी दहशतवाद्यांचा समावेश आहे. काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी रद्द केले. तेव्हापासून आजवर ५५० दहशतवाद्यांना सुरक्षा जवानांनी कंठस्नान घातले आहे. या व्यापक कारवाईमुळे दहशतवाद्यांनी आपल्या व्यूहनीतीत बदल केला. घातपाती कारवाया घडविण्यासाठी ते काश्मीरमधील स्थानिक युवकांचा वापर अधिक प्रमाणात करू लागले.

तीन दिवसांत दहा दहशतवादी ठारदाेघांनी नुकताच ‘लष्कर’मध्ये प्रवेश केला हाेता. त्यांच्याकडून एके-५६ रायफल, चार मॅगझीन आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये दहा दहशतवाद्यांना ठार मारले आहे.

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर