नवी दिल्ली - काश्मिरातील सोपोरमध्ये संरक्षण दलाचे जवान आणि दहशतवाद्यांत झालेल्या चकमकीत एका 60 वर्षांच्या नागरिकाचा मृत्यू झाला. या व्यक्तीचा मन हेलावून टाकणारा एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत एक चिमुकला आपल्या मृत आजोबांच्या मृतदेहावर बसलेला दिसत आहे. या फोटोवर भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनीही एक वादग्रस्त कमेन्ट केली आहे. यानंतर भडकलेली अभिनेत्री दिया मिर्झा आणि संबित पात्रा यांच्यात ट्विटर वॉरदेखील बघायला मिळाले.
संबित पात्रा यांनी हा फोटो शेअर करत ट्विट केले होते, "पुलित्झर लव्हर्स?" संबित यांच्या या ट्विटनंतर, अनेकांनी त्यांच्या या ट्विटवर निगेटिव्ह प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्री दिया मिर्झाने संबित यांच्या ट्विटवर लिहिले आहे, " आपल्यात थोडी तरी संवेदनशिलता उरलेली आहे? तर दिग्दर्शक हंसल मेहता यांनी लिहिले, ही व्यक्ती एका राष्ट्रीय पक्षाची प्रवक्ता आहे. पण, खरे तर एक ट्रोल आहे आणि अशा व्यक्तीचा रिपोर्ट करायलाच हवा.
भारतानंतर आता 'हा' देशही आक्रमक, चीनविरोधात मोर्चेबांधनीला केली सुरुवात
भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!
यानंतर संबित यांनीही दिया मिर्झाला उत्तर दिले, "हो मॅडम माझ्यात संवेदनशिलता आहे. आपल्या सैन्यासाठी. प्रत्येक भारतीय नागरिकासाठी, मग तो कुठल्याही धर्माचा असो. मात्र, आपल्याप्रमाणे आमच्या संवेदना सिलेक्टिव्ह नाहीत. लक्षात ठेवा, मी सिलेक्टिव्ह प्लेकार्ड होल्डर नही. मी आपला चाहता आहे आणि आपण पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाची निंदा करत, एक प्लेकार्ड आपल्या हातात धरून उभ्या राहिलात, तर मला बघायला आवडेल.
दियानेही संबित यांच्या ट्विटला उत्तर देत म्हटले आहे, संवेदना कधीही सिलेक्टिव्ह नसते. एक तर ती आपल्यात असते अथवा नसते. कुठल्याही मुलावर, अशा प्रकारच्या वेदनेतून अथवा भयावह प्रसंगातून जाण्याची वेळ येऊ नये. जी या मुलावर आली. आपण आपले राजकारण करणे थांबवावे आणि मी तुम्हाला माझा सपोर्ट देईन. मग माझ्या हातात प्लेकार्ड असो अथवा नसो.
CoronaVirus : कोरोना विषाणू होणार 'कन्फ्यूज'; आगळ्या-वेगळ्या कोरोना लसीची चाचणी यशस्वी झाल्याचा दावा
काश्मिरी नागरिकाच्या मृत्यूसंदर्भात संबित पात्रा यांनी केलेलं ट्विट -
असे मानले जाते, की संबित यांचे हे ट्विट 2020मधील पुलित्झर पुरस्कार प्राप्त पत्रकारावरील कटाक्ष होता. या जर्नालिस्टने जम्मू-काश्मीरमधील आर्टिकल 370 रद्द केल्यानंतर तेथील परिस्थितीचे अनेक फोटो जारी केले होते आणि आपल्या मार्मिक फोटोंसाठी त्यांना फिचर फोटोग्राफीतील प्रतिष्ठेचा पुलित्झर अवॉर्ड 2020 मिळाला होता.