लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि इंडिया आघाडीने जोरदार मुसंडी मारली होती. भाजपाला बहुमतापासून दूर ठेवल्याने सध्या राहुल गांधी आणि काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलेला आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेतेपद स्वीकारल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच गुजरातच्या दौऱ्यावर गेले आहेत. येथे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला लालकृष्ण अडवाणी यांच्या असलेल्या अनुपस्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला अदानी-अंबानी दिसले, पण अडवाणी दिसले नाहीत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
राहुल गांधी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, तुम्ही भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांना रथयात्रेच्या रथावर पाहिले होते. मोदींनी त्यांना मदत केली होती, असं म्हणतात. मी संसदेत विचार करत होतो की, राम मंदिराच्या कार्यक्रमामध्ये अदानी-अंबानी दिसले, मात्र गरीब दिसले नाहीत. भाजपाचं राजकारण हे अयोध्येवर केंद्रित झालेलं होतं. त्यांनी भगवान रामाला राजकारणाचा मुद्दा बनवलं, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, मी अयोध्येच्या खासदारांना विचारलं की, राम मंदिर उभारलं असतानाही इंडिया आघाडी अयोध्येत कशी काय जिंकली? त्यावर त्यांनी मला सांगितलं की, मला माहिती होतं की, मी अयोध्येतून लढणार आणि जिंकणार. राम मंदिरापासून भाजपानं आपलं राजकारण सुरू केलं आणि अयोध्येमध्येत पराभूत झाले. निवडणुकीपूर्वी भाजपानं रामाच्या नावाने राजकारणाला सुरुवात करण्याचा प्रयत्न केल आणि अयोध्येतच त्यांचा पराभव झाला, असा टोला त्यांनी लगावला.