शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

CoronaVaccine : "अदर पूनावाला, तुम्ही तर दरोडेखोरांपेक्षाही वाईट..."; भाजप आमदाराचा संताप, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 7:09 PM

कोविशिल्ड लस तयार करणारी अदर पूनावाला यांची कंपनी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया, ही जगातील सर्वात मोठी लस निर्माता कंपनी आहे.

लखनौ - गोरखपूरचे भाजप आमदार राधा मोहन दास अग्रवाल यांनी कोरोनाविरोधातील लस कोवीशील्डच्या किंमतीवरून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ही लस तयार करणारी कंपनी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एसआयआय) सीईओ अदर पुनावाला यांची तुलना दरोडेखोरांशी करत, सरकारने महामारी अधिनियमांतर्गत ही कंपनी 'अधिग्रहित' करावी, असे राधा मोहन दास यांनी म्हटले आहे. कंपनीने खासगी रुग्णालये आणि राज्य सरकारांसाठी कोवीशील्ड लशीचा दर अपेक्षेपेक्षा अधिक ठरवल्याने अग्रवाल यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे. (Adar poonawalla worse than dacoit bjp mla radha mohan das agrawal slams vaccine pricing)

CoronaVirus : शरीरातील ऑक्सीजन स्तर कमी होऊ लागला, तर करा 'हा' उपाय; आरोग्य मंत्रालयानं दिलीय माहिती

अग्रवाल यांनी बुधवारी एक ट्विट करत म्हटले आहे, ''अदर पूनावाला तुम्ही तर दरोडेखोरांपेक्षाही वाईट आहात. पंतप्रधान कार्यालय, अमित शाह, बीएल संतोष, डॉ.हर्षवर्धन यांनी तुमच्या फॅक्टरीचे अॅपिडेमिक अॅक्ट अंतर्गत अधिग्रहण करायला हवे.'' अग्रवाल यांनी आणखी एका ट्विटमध्ये कृषी खर्च आणि किंमतीसंदर्भातील स्वामीनाथन आयोगाच्या फॉर्म्यूल्याचाही संदर्भात दिला आहे.

सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियानं केलीय अशी घोषणा -अदर पूनावाला यांची कंपनी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस निर्माता कंपनी आहे. या कंपनीने बुधवारी खासगी रुग्णालयांना 600 रुपये प्रती डोस आणि राज्य सरकारांना 400 रुपये प्रती डोस दराने लस विकण्याची घोषणा केली आहे.कोरोना काळात अचानक पैशांची गरज पडली तर! जाणून घ्या, कुठून होऊ शकते तत्काळ व्यवस्था?

'या' राज्यात तब्बल 3.48 लाख डोस वाया - राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात लसीचे डोस वाया गेल्याची घटना घडली आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये हे प्रमाण सर्वाधिक असून आतापर्यंत राज्यात तब्बल कोरोना लसीचे 3.48 लाख डोस वाया गेले आहेत. सध्या देशात 45 वर्षांवरील लोकांचे लसीकरण सुरू आहे. मात्र 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लसीला मोठ्या प्रमाणात मागणी असताना प्रशासनाचा निष्काळजीपणा पाहायला मिळाला आहे. या शिवाय तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशातही मोठ्या प्रमाणावर डोस वाया गेले आहेत. 

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

टॅग्स :Adar Poonawallaअदर पूनावालाCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश