नवी दिल्ली - पाच वर्षे एकपक्षीय बहुमताचे सरकार चालवूनही भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या प्रश्नावर योग्य तोडगा काढता आलेला नाही. भाजपाने राम मंदिराबाबत घेतलेल्या संयमी भूमिकेमुळे हिंदुत्ववादी संघटनांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, काही संघटना मंदिर बांधण्यासाठी आक्रमक भूमिका घेत आहेत. दरम्यान राम मंदिराच्या प्रश्नावर सुरुवातीपासून पुढाकार घेणाऱ्या विश्व हिंदू परिषदेने या मुद्द्यावरून काँग्रेसला दिलेली ऑफर सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. तुमच्या निवडणूक जाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश करा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ अशी ऑफर विश्व हिंदू परिषदेकडून देण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमारा म्हणाले की, ''राम मंदिरासाठी ज्यांनी खुलेपणाने आश्वासन दिले आहे, त्यांना पाठिंबा दिला आहे. आता काँग्रेसने राम मंदिराचा मुद्दा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात समाविष्ट केला तर आम्ही काँग्रेला पाठिंबा देण्याबाबतही विचार करू. त्यांनी आरएसएच्या स्वयंसेवकांच्या काँग्रेस प्रवेशावर घातलेली बंदी मागे घ्यावी. केवळ जानवे परिधान करून हे होणारे नाही.'' काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक राहुल गांधी यांनी राम मंदिराबाबत एक मोठे वक्तव्य केले होते. राम मंदिराचा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ठ आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत रोजगार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे ठरतील, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आलेले हे वक्तव्य भाजपासाठी धक्का मानला जात आहे. तसेच राम मंदिर बांधण्याबाबत विश्व हिंदू परिषदेचा भाजपावर असलेला विश्वस उडत चालल्याचे या वक्तव्यामधून दिसत असल्याचे दिसत आहे.
राम मंदिराचा जाहीरनाम्यात समावेश करा, पाठिंबा देतो; विश्व हिंदू परिषदेची काँग्रेसला ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 11:15 AM
पाच वर्षे एकपक्षीय बहुमताचे सरकार चालवूनही भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या प्रश्नावर योग्य तोडगा काढता आलेला नाही. भाजपाने राम मंदिराबाबत घेतलेल्या संयमी भूमिकेमुळे हिंदुत्ववादी संघटनांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठळक मुद्देपाच वर्षे एकपक्षीय बहुमताचे सरकार चालवूनही भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या प्रश्नावर योग्य तोडगा काढता आलेला नाहीभाजपाने राम मंदिराबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे हिंदुत्ववादी संघटनांमध्ये संशयाचे वातावरण तुमच्या निवडणूक जाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश करा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ अशी ऑफर विश्व हिंदू परिषदेकडून देण्यात आली आहे