सेक्स रॅकेट जोड
By admin | Published: December 27, 2014 11:38 PM
मुख्य सूत्रधार फरार
मुख्य सूत्रधार फरारवेश्या व्यवसायाचे रॅकेट चालविणारा सचिन सोनारकर फरार झाला. ताब्यात घेतलेल्या तरुणींमध्ये एक तरुणी मुंबईची होती. चार दिवसांपूर्वी तिला सचिन सोनारकरने ५ हजार रुपये प्रति दिवस देण्याचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी नागपुरात आणले होते. तिला त्याने रामनगरातील आपल्या फ्लॅटवर मुक्कामी ठेवले होते. मागणीनुसार, तो तिला विविध ठिकाणी पाठवत होता. त्याच्याकडे ४० ते ५० वारांगना आणि शेकडो ग्राहकांचे पत्ते व मोबाईल नंबर असल्याचे पोलीस निरीक्षक पवार सांगतात. तो गेल्या अनेक वर्षांपासून या धंद्यात सक्रिय असून, महिन्याला तो २५ ते ३० लाख रुपये मिळवतो, असेही पोलिसांना कळले आहे. कमाल चौकात राहाणाऱ्या सचिनने नागपुरात विविध भागात तीन पॉश सदनिका घेतल्याचेही तपासात उघड झाले आहे. त्यांच्याकडून या कामासाठी वापरण्यात येणारी इंडिगो कार पोलिसांनी जप्त केली. ---