शहरं
Join us  
Trending Stories
1
ZIM vs IND T20I : झिम्बाब्वेची विजयी सलामी! भारताची 'युवा'सेना पराभूत; गिल-सुंदरची झुंज अयशस्वी
2
"हिंदू हिंसक असते तर...", दोन वर्षांनंतर सार्वजनिक व्यासपीठावरून नुपूर शर्मा स्पष्टच बोलल्या? बघा VIDEO
3
"भुजबळांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर याद राखा"; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
आशिया चषकासाठी Team India ची घोषणा; १९ जुलैला भारत विरूद्ध पाकिस्तान थरार!
5
"७० दिवसानंतर खरी मॅच सुरू होईल तेव्हा जनताच खोके सरकारची कॅच घेईल’’, एकनाथ शिंदेंना नाना पटोलेंचा टोला 
6
ZIM vs IND : झिम्बाब्वेकडून भारताचा पराभव! खासदार शशी थरूर यांची BCCI वर बोचरी टीका, म्हणाले...
7
Sangli: वटवाघळामुळे आरामबसचा अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली; चालकासह प्रवासी किरकोळ जखमी
8
राहुल गांधींनी भेट घेतलेले लोको पायलट खरे की प्रोफेशन ॲक्टर्स? भाजपा-काँग्रेस आमने सामने
9
हाय कोलेस्ट्रॉल, हार्ट अ‍ॅटॅकचं टेन्शन सोडा, या 5 गोष्टी आहारात सुरू करा; मग बघा कमाल...!
10
नशीब बलवत्तर, मोठी दुर्घटना टळली! लोखंडी अँगल कारच्या काचा फोडून शिरले आत
11
सूर्यकुमार म्हणाला,‘चेंडू हातात बसला;’ पण त्याच्या  'हाता'मागे होता एक भक्कम 'हात'! माहीत आहे कुणाचा?
12
महत्वाची अपडेट! देशाचा अर्थसंकल्प २३ जुलैला मांडला जाणार; मोदी ३.० काय काय घोषणा करणार? 
13
सायकल चालवायचा शौक! 69769 किमींचा रेकॉर्ड; जितेंद्र कोठारींचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
पुढच्यावेळी 'या' मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार; महादेव जानकरांनी थेट मतदारसंघच सांगितला
15
PM आवासचा पहिला हप्ता मिळताच 11 महिला प्रियकरासोबत 'भुर्र'! पती म्हणतायत, दुसरा हप्ता देऊ नका
16
धावत्या बाइकवर रिल्स बनवताना आयुष्य थांबले; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याचे पाय निकामी
17
IND vs ZIM Live : वडिलांसाठी भावनिक क्षण! लेक रियान परागला पदार्पणाची सोपवताना 'बाप'माणूस भारावला
18
मुंबईत १ कोटीचा फ्लॅट, ऑडी कार, असा पकडला गेला करोडपती चोर, लाईफस्टाईल पाहून पोलीसही अवाक्
19
कोणाची मध्यस्थी फळली? हमास-इस्त्रायल युद्ध थांबणार; या छोट्या देशाने निभावली महत्वाची भुमिका
20
ना हॉटस्टार, ना Jio Cinema! India vs Zimbabwe Live मॅच कुठे पाहायची? वाचा सविस्तर

बिहारमधील 'वाढीव' १५ टक्के आरक्षण रद्द; नितीशकुमार वरच्या कोर्टात जाणार, मराठा आरक्षणाची धाकधुक वाढली...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 7:21 PM

Bihar Reservation High Court News: हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात नितीशकुमार सुप्रिम कोर्टात जाणार, आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून ६५ टक्के केली होती.

काही महिन्यांपूर्वी बिहार सरकारने जातीय जनगणना करून त्यावरून आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून ६५ टक्के केली होती. या आरक्षणाला पटना हायकोर्टाने सुरुंग लावला असून ते रद्द केले आहे. केंद्रात सत्तेत गेलेल्या नितीशकुमार यांना मोठा झटका बसला आहे. याविरोधात बिहार सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार असले तरी इकडे महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबत धाकधुक वाढली आहे. 

बिहार सरकारने १५ टक्क्यांनी वाढविलेल्या आरक्षणाला पाटना उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. यावर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने आज हा महत्वाचा निर्णय दिला आहे. एससी, एसटी, ईबीसी आणि इतर मागासवर्गीयांना शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये नितीशकुमार सरकारने आरक्षण दिले होते. 

या सुनावणीवेळी इंदिरा साहनी खटल्याचा वारंवार उल्लेख करण्यात आला होता. याच खटल्यावरून महाराष्ट्र सरकारने देखील महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची घोषणा केली होती. ११ मार्चला बिहारमध्ये आरक्षणावरील सुनावणी संपली होती. हा निकाल लोकसभा निवडणुकीमुळे राखून ठेवण्यात आला होता.  

बिहारमध्ये सध्या OBC ला 27%, SC ला 15% आणि ST ला 7.5% आरक्षण मिळाले आहे. त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या सर्वसाधारण प्रवर्गातील लोकांनाही १० टक्के आरक्षण मिळाले आहे.

कशाच्या आधारावर आरक्षण फेटाळले...एससी-एसटी, ओबीसी आणि ईबीसीसाठी जे आरक्षण वाढवण्यात आले होते ते घटनेच्या कलम 14, 15 आणि 16 च्या विरोधात होते. इंदिरा साहनी प्रकरणात एससी, एसटी आणि ओबीसी या तीन प्रवर्गासाठी कोणत्याही परिस्थितीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ करता येणार नाही, असा निर्णय देण्यात आला होता. कोर्टाने यावरच बोट ठेवत बिहार सरकारने दिलेले आरक्षण कायदा रद्द केला आहे. 

टॅग्स :Biharबिहारreservationआरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणHigh Courtउच्च न्यायालय