शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मालेगावचे अपर जिल्हाधिकारी पवार सक्तीच्या रजेवर

By admin | Published: August 14, 2015 12:05 AM

नाशिक : लाच प्रकरणात अडकलेले मालेगावचे अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांना विभागीय आयुक्तांनी सक्तीच्या रजेवर पाठविले असून, त्यांच्या जागी नाशिकचे अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांना पदभार देण्यात आला आहे. सोमवारी ज्या काही फायली व निर्णयांवर पवार यांनी स्वाक्षरी केली त्याची माहितीही जिल्हा प्रशासनाने मागविली आहे.

नाशिक : लाच प्रकरणात अडकलेले मालेगावचे अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांना विभागीय आयुक्तांनी सक्तीच्या रजेवर पाठविले असून, त्यांच्या जागी नाशिकचे अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांना पदभार देण्यात आला आहे. सोमवारी ज्या काही फायली व निर्णयांवर पवार यांनी स्वाक्षरी केली त्याची माहितीही जिल्हा प्रशासनाने मागविली आहे.
गेल्या गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रामचंद्र पवार व त्यांचा सहकारी दिनेशभाई पंचासरा या दोघांना अटक करून ताब्यात घेतले होते. त्यानंतर दोन दिवस त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. रविवारी न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केल्यानंतर सोमवारी सायंकाळी उशिरा पवार यांनी मालेगाव येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयात हजेरी लावून काही महत्त्वाच्या फायलींवर स्वाक्षर्‍या केल्या. त्यानंतर मंगळवारपासून पवार कोठे आहेत याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयाला काहीच कल्पना नाही.
शनिवारी साजरा होणार्‍या स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापनदिनी मालेगाव उपविभागीय कार्यालयातील ध्वजारोहण अपर जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते करण्याचा प्रघात आहे; परंतु पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लागल्यामुळे प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला होता. तथापि, विभागीय आयुक्तांनी मालेगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचा अतिरिक्त पदभार भानुदास पालवे यांच्याकडे सोपवून एक प्रकारे पवार यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे.