आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लोकसभेतील काँग्रेसचे नेते व पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले आहे की, आपल्याला लोकसभेतून निलंबित करण्याला ते न्यायालयात आव्हान देऊ शकतात. यावर विचार सुरू आहे.
अविश्वास प्रस्तावावरील चर्चेच्या कालावधीत त्यांच्या भाषणावरून चर्चा झाली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना नीरव मोदीशी केली होती. तथापि, चौधरी यांच्या भाषणाचा हा वादग्रस्त भाग संसदेच्या रेकॉर्डवरून हटविण्यात आला होता. परंतु, त्याच्या पुढच्याच दिवशी चौधरी यांना निलंबित करण्यात आले होते.
संजय सिंह, राघव चढ्ढा, सुशीलकुमार रिंकू यांच्यानंतर संसदेतून निलंबित होणारे अधीर रंजन चौधरी हे चौथे खासदार आहेत. विशेषाधिकार समिती जेव्हा बोलावेल तेव्हा मी जाणार आहे. मी तर त्यासाठी अधीर होत आहे, असे अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले आहे.
मी निलंबित सदस्य...
दिल्ली सरकार (दुरुस्ती) विधेयक प्रवर समितीकडे पाठविण्याचा प्रस्ताव पाच खासदारांच्या संमतीशिवाय सादर केल्याबद्दल निलंबित करण्यात आलेले आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांनी ट्विटर म्हणजे एक्सवर आपला परिचय बदलून ‘निलंबित राज्यसभा सदस्य’ असा केला आहे.