शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Aditya Thackeray Meets Arvind Kejariwal: कर्नाटक निवडणुकीनंतर राजकीय हालचालींना वेग; दिल्लीत आदित्य ठाकरेंनी घेतली CM केजरीवालांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 3:44 PM

Aditya Thackeray Meets Arvind Kejriwal: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दणदणीत विजय मिळाल्यामुळे विरोधकांचे मनोबल उंचावले आहे.

Aditya Thackeray Meets Arvind Kejriwal: काल कर्नाटक विधानसभा निवडणूक पार पडली. यानंतर दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यात रविवारी (14 मे) सकाळी दिल्लीत झालेल्या भेटीनंतर चर्चेला उधाण आले आहे. 

या भेटीची माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन दिली. ट्विटरवर भेटीचे फोटो शेअर करत आदित्य ठाकरे म्हणाले, ''आज सकाळी मी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी खासदार डॉ. प्रियंका चतुर्वेदी आणि आपचे खासदार संजय सिंह उपस्थित होते. यावेळी आमच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. देशातील लोकशाही आणि आपली राज्यघटना धोक्यात आहे आणि आपण तिचे सर्व प्रकारे संरक्षण केले पाहिजे.'' ही बैठक सुमारे तासभर चालली. लोकसभा निवडणुकीसाठी 2024 हे वर्ष खूप खास आहे आणि त्यासाठी सर्व पक्ष एकजुटीने रणनीती आखण्यात गुंतले आहेत.

परिणीती चोप्राच्या साखरपुड्यात हजेरी

शनिवारी संध्याकाळी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप खासदार राघव चढ्ढा यांच्या एंगेजमेंट पार्टीमध्ये आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. तिथे त्यांच्यासोबत शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदीही उपस्थित होत्या. एंगेजमेंट पार्टीत अरविंद केजरीवाल त्यांच्या कुटुंबासह उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य ठाकरे अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचले.

विरोधी एकजुटीचे प्रयत्न सुरूगेल्या काही काळापासून विरोधक एकजूट होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. केजरीवाल आणि आदित्य ठाकरे यांची भेट अशा वेळी झाली आहे, जेव्हा एक दिवस आधी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दणदणीत विजय मिळाला आहे. कर्नाटकातील या विजयानंतर विरोधकांचे मनोबल उंचावले आहे. पीएम मोदींचा पराभव होऊ शकतो, असा आत्मविश्वास त्यांच्यात आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर विरोधकांच्या एकजुटीची मोहीम तीव्र झाली आहे. या अनुषंगाने केजरीवाल आणि आदित्य ठाकरे यांची भेटीकडे पाहिले जात आहे.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीAAPआपShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे