ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 17 - जेव्हा देश एक आहे तर समान नागरी कायदा का नाही?, असा प्रश्न उपस्थित करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समान नागरिक कायद्याचे समर्थन केले आहे. देश एक आहे तर लग्नसंबंधीचे नियमही एकसमान का नसावेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी ट्रिपल तलाक मुद्दाही उपस्थित केला.
माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या 91 व्या जयंतीनिमित्त त्यांच्यावर लिहिण्यात आलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत हेाते. या कार्यक्रमात त्यांनी "ट्रिपल तलाक"चा मुद्दाही उपस्थितीत केला. ट्रिपल तलाक या मुद्यावर काही लोकांनी स्वीकारलेल्या मौनावर त्यांनी शंका उपस्थित केली.
ट्रिपल तलाकसंदर्भात आदित्यनाथ म्हणाले की, "देशातील समस्यांवर काही लोकांचे तोंड बंद आहे. महाभारतात द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी उपस्थित लोकांनी स्वीकारलेल्या मौनाचे उदाहरण देत ट्रिपल तलाकवर ज्यांचे मौन आहे, ते एखाद्या गुन्हेगारासारखेच आहेत, अशी खोचक टीका आदित्यनाथ यांनी केली. ट्रिपल तलाक ही खूप मोठी समस्या असून या प्रथेमुळे महिलांवर अन्याय होत आहे, असंही यावेळी त्यांनी सांगितले.
दरम्यान, "चंद्रशेखरही समान नागरी कायद्याच्या बाजूने होते", असेही यावेळी आदित्यनाथ यांनी सांगितले. शिवाय, सर्वांसाठी एकच कायदा असावा. लोकांचे कल्याण सर्वांचे लक्ष्य असायला हवं, असेही मत त्यांनी यावेळी मांडले.
Some people who are silent on the issue of #TripleTalaq are equally guilty: UP CM Yogi Adityanath in Lucknow. pic.twitter.com/Vy01soHzbW— ANI UP (@ANINewsUP) April 17, 2017
Chandra Shekhar ji ne kaha tha ke agar hamare faujdaari ke maamle aur shaadi vivah samaan hai to Uniform Civil Code kyun nahi?: UP CM pic.twitter.com/3dlA5c5P0N— ANI UP (@ANINewsUP) April 17, 2017