बलवंत तक्षक
लोकमत न्यूज नेटवर्क, चंडीगड : हरयाणातील प्राथमिक शाळांमध्ये चार लाख मुलांना बनावट प्रवेश दिल्याचे प्रकरण समोर आले असून, सीबीआयने प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पंजाब-हरयाणा हायकोर्टाने २०१९ मध्ये सीबीआयला चौकशीचा आदेश दिला होता. पाच वर्षांनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरयाणाच्या सरकारी शाळांमध्ये चार लाखांचे बनावट प्रवेश आणि त्यांच्या नावावर निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचाराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१६ मध्ये जेव्हा हरयाणा सरकारने कंत्राटी शिक्षकांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी याचिका दाखल केली होती, तेव्हा ही बाब उच्च न्यायालयासमोर आली होती.