२१ विद्यार्थ्यांना घेतले दत्तक
By admin | Published: July 23, 2016 12:02 AM
जळगाव : श्री इच्छापूर्ती गणेश व महादेव मंदिराच्या विश्वस्तांनी तसेच श्याम कोगटा मित्र परिवारातर्फे शहरातील गरीब, होतकरू अशा २१ विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले आहे.
जळगाव : श्री इच्छापूर्ती गणेश व महादेव मंदिराच्या विश्वस्तांनी तसेच श्याम कोगटा मित्र परिवारातर्फे शहरातील गरीब, होतकरू अशा २१ विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले आहे. १ ली ते १० मध्ये शिक्षण घेणारे हे विद्यार्थी आहेत. त्यांच्या सर्व शिक्षणाचा खर्च विश्वस्त आणि मंडळ करणार आहे. या कार्यक्रमप्रसंगी श्याम कोगटा, प्रशांत पाटील, अशोक माळी, दिनेश राठी, योगेश कलंत्री, विष्णूकांत तापडिया, श्रीकांत वाणी, शिरीष पाटील, नगरसेवक राजू मोरे, रमेश माळी, मनोज चौधरी, निखिल कुलकर्णी उपस्थित होते. माथाडी संघटनेच्या अध्यक्षपदी देशपांडेजळगाव- उत्तर महाराष्ट्र माथी, इतर श्रमजीवी, असंरक्षित व असंघटीत कामगार संघटनेला शासनाने मान्यता दिली असून, अध्यक्षपदी ॲड.जमील देशपांडे यांची निवड झाली आहे. धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील माथाडी व इतर कामगारांची नोंदणी केली जाणार आहे. कार्यकारिणी : उपाध्यक्ष सुनील माळी, सचिव संजय चांदेलकर, खजिनदार भगवान माळी, सदस्य गोपाल महाजन, सुनील महाजन, सुभाष माळी आदी. विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमजळगाव- ब्राह्मण ेकता मंडळातर्फे २४ रोजी आयएमआर महाविद्यालयात दुपारी ४ वाजता यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. संबंधित पालकांनी सत्कारस्थळी आपल्या पाल्यांसह व गुणपत्रिकांच्या झेरॉक्ससह उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. व.वा.वाचनालयाची सभाजळगाव- व.वा.वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा २४ रोजी सकाळी ९ वाजता वाचनालयाच्या सभागृहामध्ये होणार आहे. सभेची सूचना फलकावरही लावली आहे. सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वाचनालयाचे चिटणीस मिलिंद कुळकर्णी यांनी केले आहे. हिंगोणेकर मंडळाची सभाजळगाव- जळगाव निवासी हिंगोणेकर मित्र मंडळाची वार्षिक सभा १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता लेवा बोर्डींग हॉल येथे होणार आहे. या वेळी विविध कार्यक्रमदेखील होतील. तसेच नवीन निर्णय घेतले जातील. एन.एस.पाटील प्रमुख अतिथी राहतील. आर.डी.वायकोळी अध्यक्षस्थानी राहतील. अत्रे विद्यामंदिराचा वर्धापन दिनजळगाव- कै.सौ.सु.वा.अत्रे प्राथमिक विद्यामंदिराचा तिसरा वर्धापन दिन गंधे सभागृहात साजरा झाला. शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष ॲड.सुशील अत्रे, प्रेमचंद ओसवाल, पारसमल कांकरिया, ॲड.पंकज अत्रे, प्रतिभा अत्रे, पद्मजा अत्रे, रसिका अत्रे, मुख्याध्यापिका उषा बाविस्कर उपस्थित होते. रुपाली खडकीकर यांनी सूत्रसंचालन केले. भाग्यश्री कुलकर्णी यांनी आभार मानले. विपश्यना ध्यान शिबिराचे आयोजनजळगाव- धम्म जळगाव विपश्यना केेंद्र, साने गुरुजी कॉलनी येथे ७ ते १८ऑगस्टयादरम्यान१०दिवसीयध्यानशिबिराचेआयोजनकरण्यातआलेआहे.नोंदणीसाठीरोशनअगबरत्ती,सुभाषचौक,जळगावयेथेसंपर्कसाधावा.