नवी दिल्ली : भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, सुपरस्टार अमिताभ बच्चन, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि पंजाबचे मुख्यमंत्री व अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाश सिंग बादल यांना ‘पद्मविभूषण’ या देशातील दुस-या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले आहे.माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक दिवंगत पंडित मदन मोहन मालवीय यांना याआधीच ‘भारतरत्न’ जाहीर झाले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस रविवारी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या एकूण १०४ व्यक्तींना ‘पद्म’ सन्मान जाहीर झाले. त्यात नऊ जणांना पद्मविभूषण, २० जणांना पद्मभूषण तर ७५ जणांना पद्मश्रीने गौरविण्यात येणार आहे. येत्या मार्च/ एप्रिलमध्ये राष्ट्रपती भवनात होणाऱ्या सोहळ्यात ‘भारतरत्न’ व अन्य पद्म सन्मानांचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते वितरण होईल. यंदा हा गौरव प्राप्त झालेल्यांमध्ये आठ मान्यवर महाराष्ट्रातील आहेत. राज्याच्या वाट्याला दोन पद्मविभूषण, एक पद्मभूषण व सहा पद्मश्री सन्मान आले आहेत. ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ व परमसंगणाचे निर्माते डॉ. विजय भटकर ‘पद्मभूषण’चे मानकरी ठरले आहेत. पद्मपुरस्कार विजेत्यांमध्ये १०४ जणांचा समावेश आहे. त्याची यादी पुढीलप्रमाणे,पद्मविभूषण : १) लालकृष्ण अडवाणी, २)अमिताभ बच्चन, ३) प्रकाशसिंग बादल, ४) डॉ. डी. वीरेंद्र हेगडे, ५) दिलीपकुमार, ६) जगद्गुरू रामभद्राचार्य,मलूर ७) रामास्वामी श्रीनिवासन, ८) के. वेणुगोपाल,९) करीम अल हुसैनी आगा खान(फ्रान्स/ ब्रिटन)पद्मभूषण : १) जान्हू बरूआ, २) डॉ. विजय भटकर,३) स्वपन दासगुप्ता, ४)स्वामी सत्यामित्रानंद गिरी, ५) एन. गोपालस्वामी,६)डॉ. सुभाष सी. कश्यप, ७) डॉ. गोकुलेत्सवजी महाराज, ८) डॉ. अंबरिश मिथाल, ९) सुधा रघुनाथन १०)हरीश साळवे ११) डॉ. अशोक सेठ १२) रजत शर्मा १३) सतपाल,१४) शिवकुमार स्वामी १५)डॉ. खरागसिंग वाल्दिया १६)प्रो. मंजूल भार्गव(अमेरिका) १७) डेव्हिड फ्रॉले(अमेरिका)१८) बिल गेटस्(अमेरिका), १९) मेलिंडा गेटस् २०)साईचिरो मिसुमी(जपान)पद्मश्री : १) डॉ. मंजुला अनागनी, २ ) एस. अरुणन, ३) डॉ. बेट्टिना शारदा बाऊमेर,४) नरेश बेदी ५) अशोक भगत ६) संजय लीला भन्साळी ७) डॉ. लक्ष्मीनंदन बोरा ८)डॉ. ग्यान चतुर्वेदी ९) योगेशकुमार चावला १०)जयकुमारी चिक्काला ११) विवेक देबरॉय १२)सारुंगबम बिमोला कुमारी देवी १३)डॉ. अशोक गुलाटी १४)डॉ. रणदीप गुलेरिया १५)डॉ. के.पी. हरिदास १६) राहुल जैन १७) रवींद्र जैन १८) डॉ. सुनील जोेगी १९) प्रसून जोशी २०) डॉ. प्रफुल्ला कार २१)सबा अंजुम २२) उषाकिरण खान २३)डॉ. राजेश कोटेचा २४) प्रोश्र अल्का कृपाणी २५) डॉ.हर्षकुमार २६)नारायण पुरुषोत्तम २७) लाम्बर्ट मास्करन्हास २८) डॉ. जनक पाल्ता मॅकगिलान, २९ ) वीरेंद्र राज मेहता ३०) तारक मेहता ३१) नेल हेबर्ट नॉगकिनरिह ३२) चेवांग नॉरफेल ३३) टी.व्ही. मोहनदास पै ३४) डॉ. तेजस पटेल ३५) जदव मोलाई पेयांग ३६ ) बिमला पोद्दार ३७) डॉ. एन. प्रभाकर ३८) डॉ. प्रल्हाद ३९)डॉ. नरेंद्र प्रसाद ४०) रामबहादूर राय ४१) मिथाली राज, ४२) पी.व्ही. राजारामन ४३) प्रो. एस.जे. राजपूत ४४)कोटा श्रीनिवास राव ४५) प्रो. विमल रॉय ४६)शेखर सेन ४७) गुणवंत शाह ४८)ब्रह्मदेव शर्मा ४९) मनू शर्मा ५०) प्रो. योगराज शर्मा ५१)वसंत शास्त्री ५२) एस. के. शिवकुमार ५३) पी.व्ही. सिंधू ५४) सरदारसिंग ५५)अरुनिमा सिन्हा ५६) महेशराज सोनी ५७) डॉ. निखिल टंडन ५८) एच. थेग्टेसे रिंगपोचे ५९)डॉ. हरगोविंद लक्ष्मीशंकर त्रिवेदी ६०) हाँग बोशेंग ६१)प्रो. जेकस् ब्लामोन्ट ६२) दिवंगत सय्यदना मोहम्मद बुऱ्हानुद्दीन ६३)जीन क्लॉडी कॅरीअर ६४) डॉ. नंदराजन राज चेट्टी ६५) फ्रान्स जॉर्ज एल. हार्ट (अमेरिका)६६) जगदगुरु अमर्ता सूर्यानंदा महाराज (पोतुर्गाल) ६७)दिवंगत मीठालाल मेहता ६८) डॉ. दत्तात्रेयूदू नोरी ६९)डॉ. रघुराम पिल्लारीसेठी ७०) डॉ. सौमित्रा रावत ७१) प्रो. अनॅट्टेी स्कमिडचेन(जर्मनी)७२) दिवंगत प्राणकुमार शर्मा ऊर्फ प्राण ७३) दिवंगत आर. वासुदेवन ७४) जान्हू बरूआ (लोकमत न्यूज नेटवर्क)
आडवाणी, अमिताभ, दिलीप कुमार ‘पद्मविभूषण’
By admin | Published: January 26, 2015 5:05 AM