मुंबई/औरंगाबाद : केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय व नवी दिल्ली येथील एम्सच्या वार्धक्यशास्त्र विभागाने सोमवारी कोविड -१९ महामारीच्या साथीमध्ये देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मार्गदर्शक सूचना जारी केली. संकटाच्या या काळात सुरक्षित कसे राहावे. त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी, यासंबंधी काही मार्गदर्शक तत्त्वे यात निश्चित केली. मंत्रालयाचे सचिव आर. सुब्रह्मण्यम यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून सर्व जिल्ह्यांत या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यास सांगितले आहे.
या पत्रात म्हटल्यानुसार, २०११ च्या जनगणनेच्या वयोगटाच्या आकडेवारीनुसार देशात अंदाजे १६ कोटींपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिक आहेत. ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे. ६० ते ६९ वयोगटात ८ कोटी ८० लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. ७० ते ७९ मध्ये ६ कोटी ४० लाख, तर काळजीवाहूंची गरज असलेल्या (ज्यांचे वय ८० वर्षांपेक्षा अधिक आहे) नागरिकांची संख्या २ कोटी ८० लाख आहे. देशात निराधार किंवा कुटुंब सांभाळत नसलेल्या ज्येष्ठांची संख्या १८ लाख आहे. असे देशात एकूण १८ कोटी १८ लाख ज्येष्ठ आहेत. या नागरिकांना कोविड-१९ च्या काळात धोका अधिक वाढला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि त्यांचे काळजीवाहू यांच्यासाठी दिलेली ही अॅडव्हायझरी या काळात त्यांचा धोका कमी करण्यात उपयोगी पडणार असल्याचे या पत्रात म्हटले आहे.हे कोणासाठीआहे?च्६० वर्षे व त्याहून अधिक, विशेषत: उपरोक्त वैद्यकीय स्थिती असलेलेच्दमा, श्वसनात तीव्र अडथळ््यांचे दीर्घकालीन श्वसन रोगच्फुफ्फुसाचे आजार (सीओपीडी), ब्रॉन्काइकेटेसिस,च्तीव्र हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोगच्मूत्रपिंडाचा आजार, अल्कोहोलिक आजारच्व्हायरल हिपॅटायटिससारखा तीव्र यकृत रोगच्पार्किन्सन, स्ट्रोकसारखी तीव्र न्यूरोलॉजिकल स्थितीहे करासंपूर्ण वेळ घरात राहून अभ्यागतांना भेटणे टाळाकोणालाही भेटताना एक मीटर अंतर पाळाएकटेच राहत असल्यास निरोगी काळजीवाहू निवडाकोणत्याही परिस्थितीत लहान, मोठी संमेलने पूर्णपणे टाळाघरात असताना मोबाईल जवळ ठेवाघरीच हलका व्यायाम आणि योग करण्याचा विचार कराजेवण करण्यापूर्वी, वॉशरूम वापरल्यानंतर वीस सेकंद हात धुवामोबाईल असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठीवारंवार स्पर्श केलेला चष्मा, मोबाईल, काठी आदी वस्तू स्वच्छ कराशिंंकताना- खोकताना टिशू पेपर किंवा रुमालाचा वापर कराघरी शिजवलेले ताजे गरम जेवण घ्यारोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रस प्यादररोज लिहून दिलेली औषधे नियमितपणे घ्याताप, खोकला, श्वासास अडचणी आल्यास जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधाशक्यतो डॉक्टरांशी फोनवर बोलून रुटीन उपचार सुरू ठेवा.आपल्या कुटुंबातील सदस्यांशी बोलानातेवाईक, मित्रांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंंगवर बोलाआवश्यक असल्यासकुटुंबातील सदस्यांकडून मदत घ्याउन्हाळ््यामुळे, डिहायड्रेशन टाळा. पाण्याचा पुरेसा वापर करा.हे करू नकाताप, सर्दी - खोकला, श्वसन विकार असणाऱ्यांच्या जवळ जाणेमित्र, परिवाराच्या गळाभेटी, हस्तांदोलन, जवळून संपर्कगर्दीची ठिकाणे, उद्याने, बाजारपेठा, धार्मिक ठिकाणी जाणेहातावर खोकणे, शिंंकणेडोळे, चेहरा नाकावर वारंवार हात लावणेमनाने औषधोपचार, नियमित चेकअपसाठी रुग्णालयात जाणेनातेवाईकांना घरी बोलावणे