शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला महागात, उच्च न्यायालयाचा निकाल सुप्रीम कोर्टात रद्द 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 12:28 PM

या प्रकरणात उच्च न्यायालयाने लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात जिल्हा न्यायालयात २० वर्षांची शिक्षा झालेल्या एका आरोपीची निर्दोष मुक्तता केली होती. 

नवी दिल्ली : किशोरवयीन मुलींना लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवण्याचा आक्षेपार्ह सल्ला देणारा कोलकाता उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी रद्दबातल ठरवला. या प्रकरणात उच्च न्यायालयाने लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात जिल्हा न्यायालयात २० वर्षांची शिक्षा झालेल्या एका आरोपीची निर्दोष मुक्तता केली होती. 

न्यायमूर्ती अभय एस. ओक आणि न्या. उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने कोलकाता उच्च न्यायालयाचा निकाल फिरवताना मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत प्रकरणे हाताळण्याबाबत अधिकाऱ्यांना अनेक निर्देश दिले आहेत. न्या. ओक यांनी खंडपीठाच्या वतीने निकाल देताना सांगितले की, न्यायालयांनी निवाडे कसे लिहावेत याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

हायकोर्ट काय म्हणाले? या निकालात उच्च न्यायालयाने म्हटले होते की, किशोरवयीन मुलींनी आपल्या लैंगिक भावनांना आवर घातला पाहिजे. कारण, अशा प्रकारात दोन मिनिटांच्या सुखासाठी समाजाच्या नजरेत ती संपलेली असते. नेमक्या या निरीक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप नोंदविला. 

असे आहेत आक्षेप - उच्च न्यायालयाने मांडलेली निरीक्षणे माणसाला जगण्याच्या अधिकारांतर्गत दिलेल्या हक्कांचे उल्लंघन आहे. - भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे. त्या हक्कालाही या निरीक्षणामुळे बाधा येते. उच्च न्यायालयाने या प्रकरणात ज्या मुद्द्यांवर चर्चा केली त्यातील बहुतेक मुद्दे हे अप्रासंगिक स्वरूपाचे आहेत. 

टॅग्स :Courtन्यायालय