नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा ठोठावली आली आहे. यावरून जेष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी निर्भयाची आई आशा देवी यांना एक अजब सल्ला दिला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ज्याप्रकारे भारताचे माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना माफ केले. त्याचप्रकारे निर्भयाच्या आईनेही दोषींना माफ केले पाहिजे, असे इंदिरा जयसिंह यांनी म्हटले आहे.
इंदिरा जयसिंह म्हणाल्या, "मी आशा देवी यांचे दु:ख समजते. तरी सुद्धा मी त्यांना सांगेन की, सोनिया गांधी यांनी आपण मृत्यूदंडाच्या विरोधात आहे, असे सांगत राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणातील दोषी नलिनीला माफ केले होते. तसेच, निर्भयाच्या आईने केले पाहिजे. आम्ही आपल्या (निर्भयाची आई)सोबत आहेत. मात्र, मृत्युदंडाच्या विरोधात आहोत."
दुसरीकडे, निर्भयाची आई आशा देवी यांनी इंदिरा जयसिंह यांचा सल्ला फेटाळून लावला आहे. आशा देवी म्हणाल्या, "मला अशाप्रकारे सल्ला देणाऱ्या इंदिरा जयसिंह कोण आहेत? संपूर्ण देशाला वाटते की, दोषींना फाशी झाली पाहिजे. फक्त यांसारख्या लोकांमुळे बलात्कार पीडितांसोबत न्याय होत नाही."
याचबरोबर, इंदिरा जयसिंह यांनी असा सल्ला देण्याची हिम्मत तरी कशी केली असा सवाल आशा देवी यांनी केला आहे. गेल्या काही वर्षांत इंदिरा जयसिंह यांची सुप्रीम कोर्टात भेट झाली. त्यावेळी त्यांनी एकदाही माझ्याबद्दल विचारले नाही. मात्र, त्या दोषींबद्दल बोलत आहेत. काही लोक बलात्काऱ्यांना समर्थन देत रोजीरोटी कमवतात. त्यामुळे बलात्काराच्या घटना बंद होत नाही, असे आशा देवी यांनी सांगितले.
दरम्यान, निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही गुन्हेगारांना आता २२ जानेवारीऐवजी १ फेब्रुवारी रोजी फासावर लटकविण्यात येणार आहे. तसे डेथ वॉरंट दिल्लीच्या कोर्टाने शुक्रवारी जारी केले. त्यानुसार, चौघांना १ फेबुवारी रोजी सकाळी ६ वाजता फासावर चढविण्यात येईल. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीशकुमार अरोरा यांनी हे डेथ वॉरंट जारी केले.
या प्रकरणातील एक दोषी मुकेश सिंह याने फाशीची २२ जानेवारी ही तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली होती. त्यावर सुनावणीच्या वेळी सरकारी वकिलांनी मुकेशसिंहचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला आहे, असे कोर्टात सांगितले. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे २२ जानेवारीला चौघांना फाशी देणे शक्य नसल्याने, न्या. अरोरा यांनी नव्या तारखेचे डेथ वॉरंट जारी केले. त्या आधी मुकेशसिंह याने केलेला दयेचा अर्ज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी फेटाळून लावला. या निर्णयामुळे अन्य तिघांची फाशीही राष्ट्रपती रद्द करणार नाहीत, असे स्पष्ट झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
'देशात दोन मुलं जन्माला घालण्याचा कायदा असणं गरजेचं'
मुंबई-पुणे ‘हायपर लूप’ प्रकल्प ‘नको रे बाबा’; उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका
‘मेगा’ भरती ही भाजपाची मेगा चूक; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कबुली
मुंबईत २६ जानेवारीपासून नाइटलाइफ सुरू; आदित्य ठाकरेंचा प्रयोग यशस्वी होणार?
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' विभागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णत: बंद