शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

Afghanistan Crisis: मोदी नसतील तर उद्या 'ते' आपण असू, व्हिडिओ शेअर करताना कंगनाचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 8:33 PM

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातील सद्यस्थितीवर जगभरातून चर्चा घडत आहे. सोशल मीडियातूनही या घटनेवर मत व्यक्त केलं जात आहे. येथील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अफगाणिस्तानातील महिला, बालक व नागरिकांबद्दल सहानुभूती व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देअफगाणिस्तान हा इस्लामिक देश बनण्यापूर्वी एक हिंदू आणि बुद्धिस्ट राष्ट्र होते. पाकिस्तान हे तालिबान्यांना सांभाळते आणि अमेरिका त्यांना हत्यारं देतात हे लक्षात ठेवायला हवं. तालिबान आता आपल्या किती जवळ आला आहे, जर मोदी नसतील तर उद्या ते आपण असू

काबुल - अफगाणिस्तानची राजधानी काबुल येथील राष्ट्रपती भवनावर रविवारी तालिबान्यांनी कब्जा केला. त्यानंतर संपूर्ण अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळविल्याचं तालिबान्यांकडून जाहीर करण्यात आलं आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी देखील देश सोडून निघून गेले आहेत. काबुलच्या सध्याच्या परिस्थितीबाबत जगभर चर्चा असून भारताचा शेजारील देश असल्याने आता अफगाणिस्तान आणि भारत या उभय देशांमधील संबंधावर चर्चा घडत आहेत. काबुलमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी ट्विटर व फेसबुकवरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

अफगाणिस्तानातील सद्यस्थितीवर जगभरातून चर्चा घडत आहे. सोशल मीडियातूनही या घटनेवर मत व्यक्त केलं जात आहे. येथील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अफगाणिस्तानातील महिला, बालक व नागरिकांबद्दल सहानुभूती व्यक्त होत आहे. विमानाच्या पाठीमागे धावताना, विमानाच्या चाकाजवळ जागा पकडून देश सोडण्याचा प्रयत्न तेथील नागरिक करताना दिसत आहेत. अभिनेत्री कंगना रनौतनेही काबुलमधील व्हिडिओ व संबंधित बातम्या शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

कंगनाने एका ब्रेकींग न्यूजचा फोटो शेअर केला आहे. आज आपण मुकाटपणे हे पाहत आहोत, उद्या हे आपल्यासोबतही घडू शकते, असे कंगनाने म्हटले आहे. तसेच, भारत सरकार अफगाणिस्तानमधील भारतीयांना देशात परत आणत आहे, त्यावरही कंगनाने प्रतिक्रिया दिली आहे. चांगलं झालं मी सीएएच्या समर्थनार्थ लढाई लढली. मी संपूर्ण जगाला वाचवू इच्छिते, पण त्यासाठी सुरुवात माझ्या घरापासून करायला हवी. मी आपल्या सरकारचे आभार मानते की, त्यांनी सीएए कायदा आणला आणि एक आशावाद दाखवला. सर्वच हिंदू, शीख, जैन, इसाई, बुद्धिस्ट, पारसी आणि शेजारील इस्लामिक देशांतील इतर धर्मीय नागरिकांना राहण्यासाठी जागा मिळेल, असा आशावाद निर्माण केला. मी अफगाणिस्तानसाठी प्रार्थना करते, असे कंगनाने म्हटले आहे. 

अफगाणिस्तान हा इस्लामिक देश बनण्यापूर्वी एक हिंदू आणि बुद्धिस्ट राष्ट्र होते. पाकिस्तान हे तालिबान्यांना सांभाळते आणि अमेरिका त्यांना हत्यारं देतात हे लक्षात ठेवायला हवं. तालिबान आता आपल्या किती जवळ आला आहे, जर मोदी नसतील तर उद्या ते आपण असू, असेही कंगनाने आपल्या फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, तालिबान सरकारसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास तयार असल्याचं चीननं आज स्पष्ट केलं आहे. त्यामुळे, चीनचा तालिबानी सरकारला पाठिंबा असल्याचे उघड झाले आहे.  

तालिबान्यांना पाकिस्तानकडून खतपाणी

एएफपी या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायला आपण तयार आहोत, असे चीनने म्हटले आहे. तर, तालिबानच्या व्यवहारावर सर्वकाही निर्भर राहीन, असे रशियाने म्हटले आहे. दरम्यान, तालिबानचे मुख्यालय पाकिस्तानमध्येच आहे. त्यामुळे, पाकिस्तानकडून तालिबान सरकारला मान्यता दिली जाईल, असेच दिसून येते. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारास पाकिस्तानकडूनच खतपाणी मिळत असल्याचं भारतीय विदेश मंत्रालयाने म्हटले होते. दुसरीकडे तुर्कीतील बहुतांश लोक या बदलाला संधी समजत आहेत 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानNarendra Modiनरेंद्र मोदीKangana Ranautकंगना राणौत