शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Afghanistan Crisis: भारत सरकार तालिबानसोबत चर्चा करणार? २० वर्षांनंतर संपर्क साधणार, सूत्रांची माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 2:01 PM

Afghanistan Crisis & India: , अफगाणिस्तानमध्ये नवे सरकार स्थापन झाल्यानंतर देशहिताच्या दृष्टीने सर्व पक्षांशी चर्चा केली जाईल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

नवी दिल्ली - अफगाणिस्तानवर तालिबाबने कब्जा केल्यानंतर आता तिथे स्थापन होणारे नवे सरकार आणि त्याच्या धोरणांबाबत चर्चा सुरूझाली आहे. दरम्यान, तालिबान सरकारसोबत भारत सरकार चर्चा करणार का? २० वर्षांनंतर तालिबानसोबतभारत सरकार संपर्क साधणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये नवे सरकार स्थापन झाल्यानंतर देशहिताच्या दृष्टीने सर्व पक्षांशी चर्चा केली जाईल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. (Sources said, Will Indian government hold talks with Taliban? Contact after 20 years )

या संदर्भातील वृत् न्यूज १८ ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. सध्यातरी संपूर्ण जगात अफगाणिस्तानच्या नव्या सरकारला मान्यता देण्याबाबत कुठल्याही देशाने औपचारिक निर्णय घेतलेला नाही. सूत्रांनी न्यूज १८ ला सांगितले की, गजर पडल्यावर तालिबानशी संपर्क साधला जाईल. तसेच चर्चा केली जाईल. सूत्रांच्या म्हणण्यानुसार अफगाणिस्तानमध्ये बदललेली परिस्थिती आणि तालिबानने सत्तेवर केलेला कब्जा विचारात घेऊन भारत सरकार लवकरच या प्रकरणी एक धोरण ठरवणार आहे. त्यानंतर तालिबानसोबत चर्चा केली जाईल. मात्र यापूर्वीही सरकारने तालिबानसोबत संपर्कात असल्याच्या वृत्तांना नकार दिला  नव्हता.

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेमध्ये भारताने मंगळवारी सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये सर्वसमावेशक सरकार असावे, यामध्ये सर्व वर्गांचे प्रतिनिधी असावेत, अशी भारताची अपेक्षा आहे. भारताचे स्थायी प्रतिनिधी इंद्रमणी पांडे यांनी मानवाधिकार परिषदेमध्ये सांगितले की, एक व्यापक प्रतिनिधित्व असलेल्या सरकारला अधिक स्वीकारार्हता आणि वैधता मिळवण्यात मदत होईल. अफगाणी महिलांचा आवाज, अफगाणी मुलांच्या अपेक्षा आणि अल्पसंख्याक समुदायाच्या अधिकारांचा सन्मान झाला पाहिजे. तसेच अफगाणिस्तानमधील स्थिरतेचा संबंध हा या प्रदेशातील शांती आमि सुरक्षेशी निगडित आहे. लष्कर आणि जैशसारख्या दहशतवादी संघटनांच्या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करत येता कामा नये.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यात ४५ मिनिटे चर्चा झाली होती. त्या चर्चेमध्ये अफगाणिस्तानमधील परिस्थितीचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला होता. रशियासारखा देशही अमेरिकन सैन्याची माघार आणि अफगाणिस्तानमधील बदल्या परिस्थितीमध्ये भारताची भूमिका महत्त्वपूर्ण राहील असे मानतो, असे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारIndiaभारतAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान