नवी दिल्ली : नॉयडामध्ये आफ्रिकी विद्यार्थ्यांवरील हल्ल्यानंतर आफ्रिकी देशांनी परिस्थिती हाताळण्याच्या भारत सरकारच्या पद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भारत सरकारने या हल्ल्यांची तीव्र निर्भर्त्सना केली नाही तसेच याची पुनरावृत्ती रोखण्यासाठी पुरेसे उपायही केले नाहीत, असा आरोप आफ्रिकी राजदूतांच्या गटाने केला. आफ्रिकी देशांच्या या पवित्र्यामुळे केंद्र सरकारसमोर राजकीय पेच निर्माण झाला आहे. हे हल्ले वांशिक द्वेषातून तसेच झाले आहेत. तथापि, भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांचा निषेध केला नाही. तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी दिसून येतील, असे उपायही केले नाहीत, असे त्यांना वाटते. शाळकरी विद्यार्थ्याच्या मृत्यूचा संबंध अमली पदार्थांशी जोडण्यात आल्यानंतर जमावाने नायजेरियन लोकांवर हल्ले केले होते. नायजेरियन तरुणांनीच अमली पदार्थ दिल्याचा आरोप होता. पोलिसांनी पाच नायजेरियन विद्यार्थ्यांना पकडले होते. तथापि, पुराव्याअभावी त्यांची सुटका झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)स्वतंत्र चौकशीची मागणीनॉयडातील घटनेबाबत आफ्रिकी देशांच्या राजदूतांनी सोमवारी विशेष बैठक घेतली. बैठकीत या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. ज्यांनी आफ्रिकी लोकांवर हल्ला केला ते वांशिक द्वेषाने पछाडलेले लोक असून, इतर वंशांचा द्वेष करतात, याबाबत बैठकीत सर्वांचे एकमत झाले. मानवाधिकार परिषद आणि इतर मानवाधिकार संघटनांद्वारे या घटनेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्याचे बैठकीत ठरले.
हल्ल्यांमुळे भारत सरकारवर आफ्रिकी देशांची नाराजी
By admin | Published: April 04, 2017 5:17 AM