लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मेहरौली येथील श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याचे सोमवारी येथील केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत (सीएफएसएल) आवाजाचे नमुने घेण्यात आले. या देशभरात गाजत असलेल्या खूनप्रकरणाचा तपास करताना पोलिसांना श्रद्धा आणि आफताब यांच्यात झालेल्या जोरदार वादाची ध्वनिफीत मिळाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. क्लिपमध्ये ते दोघे वाद घालताना ऐकू येते. त्यामुळे हा एक महत्त्वपूर्ण पुरावा ठरू शकतो, असा दावा पोलिसांनी केला आहे.
‘थ्रीडी’ प्रतिमा घेणार
या पार्श्वभूमीवर तपास पथक आफताबची चेहरा ओळख चाचणी घेण्याच्या प्रक्रियेत आहे. त्यात त्याची त्रिमितीय (थ्रीडी) प्रतिमा घेतली जाईल. कथित व्हिडीओतील तो मी नव्हेच, असा पवित्रा त्याने घेऊ नये म्हणून ही चाचणी करण्यात येईल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"