ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि १६. - पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा शेवटचा टप्पा आज पूर्ण झाला असून, निवडणुकांचे एग्झिट पोल यायला सुरुवात झाली आहे. यात आसाममध्ये भाजपा बाजी मारणार असल्याचे चित्र आहे. १५ वर्षानंतर आसाममध्ये भाजपा सत्तेवर येणार असल्याचे संकेत टाइम्स नाऊच्या सर्वेच्या एग्झिट पोलने दिले आहेत. त्याचप्रमाणे एबीपी न्यूज, टुडे चाणक्य, सी व्होटर, इंडिया टुडे यांनी देखील आपले एग्झिट पोल प्रसिद्ध केले आहेत. टाइम्स नाऊच्या सर्वेनुसार आसाममध्ये काँग्रेस 34 जागावर, भाजपा आणि मित्रपक्ष 76 जागावर, AIUDF 12 आणि इतर ४ जागावर निवडूण येण्याची शक्याता वर्तवली आहे.
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता, केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी, एम करुणानिधी आणि व्ही.एस.अच्युतानंदन हे प्रमुख नेते निवडणूक रिंगणात आहेत. तामिळनाडू, केरळ, पुडूच्चेरी, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीची मतमोजणी १९ मे रोजी होणार आहे.
तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या २३३ जागांसाठी ३,७७६ उमेदवार रिंगणात आहेत. यात ३२० महिला आहेत. ५.८२ कोटी मतदारांकडे मतदानाचा अधिकार आहे. केरळमध्ये विधानसभेच्या १४० जागांसाठी १२०३ उमेदवार रिंगणात आहेत. यात १०९ महिला आहेत.
पुडूच्चेरीमध्ये दोन काँग्रेसपक्षांमध्येच लढत आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या एन.रंगासॅमी यांनी काँग्रेसला आव्हान दिले आहे. पुडूच्चेरीमध्ये तीस जागांसाठी ३३४ उमेदवार रिंगणात आहेत. यात २१ महिला आहेत.
एक्सिसच्या सर्वेनुसार निवडणूक झालेल्या ५ ही राज्यातील एग्झिट पोल
एबीपी न्यूजच्या सर्वेनुसार
आसाममध्ये कांग्रेस 33,
BJP गठबंधन 81,
AIUDF 10
इतर २ जागा
टुडे चाणक्यच्या सर्वेनुसार प. बंगालमध्ये
TMC 210,
लेफ्ट गठबंधन 70,
बीजेपी 14,
इतर ०० जागा
सी व्होटरच्या एग्झिट पोलनुसार, तमिळनाडूत जयललिता पुन्हा सत्तेवर येणार
डीएमकेला 124-140 जागा
इंडिया टुडेच्या सर्वेनुसार केरळमध्ये
UDF 38-48,
LDF 88-101,
BJP गठबंधन 0-3,
अन्य पार्टीला 1-4 जागा
इंडिया टुडे सर्वे प. बंगाल
TMC 243 ,
लेफ्ट गठबंधन 45,
BJP को 3
इतर 3