कोलकाता : उद्योगपती माधवप्रसाद (एमपी) बिर्ला यांच्या पत्नी प्रियंवदा बिर्ला यांच्या ५,००० कोटींच्या संपत्तीचा वाद १५ वर्षांनंतरही संपलेला नाही. एमपी बिर्ला यांचा मृत्यू १९९० साली झाला. त्यांनी ईस्ट इंडिया इन्व्हेस्टमेंट, ग्वालियर वेबिंग, पंजाब प्रोड्यूस अँड ट्रेडिंग, विध्या टेलिलिंक्स, हिंदुस्तान गम अँड केमिकल्स, बिर्ला केबल्स आदी कंपन्या स्थापन केल्या.
बिर्ला दाम्पत्याला मूलबाळ नसल्याने ही सर्व संपत्ती प्रियंवदा यांना १९९० साली वारसाहक्काने मिळाली. प्रियंवदा यांचा मृत्यू २००४ मध्ये झाला आणि काही दिवसांतच राजेंद्रसिंग लोढा नावाच्या चार्टर्ड अकाउंटंटने प्रियंवदा यांनी ही संपत्ती १९९९ साली मृत्युपत्राद्वारे आपल्याला दिल्याचा दावा केला. यानंतर, बिर्ला कुटुंबीयांनी या मृत्युपत्राला आव्हान दिले व हा खटला गेल्या १५ वर्षांपासून कोर्टात प्रलंबित आहे. दरम्यान, राजेंद्रसिंग लोढा यांचाही मृत्यू झाला असून, त्यांच्या वतीने त्यांचा मुलगा हर्षवर्धन लोढा हा खटला पुढे चालवत आहे.समिती स्थापनप्रोबेट निश्चित करण्यासाठी एक तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून, त्यात कोर्टातर्फे मोहित शहा, बिर्ला कुटुंबीयांतर्फे ए.सी. चक्रबोर्ती तर लोढा यांच्यासाठी हिंदुस्तान युनिलिव्हरचे माजी उपाध्यक्ष एम.के. शर्मा काम बघत आहेत.