शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
2
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
3
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
5
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
6
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
7
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
8
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
9
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
10
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
11
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
12
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
13
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
14
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
15
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
16
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
17
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
18
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
19
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
20
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं

30 डिसेंबरनंतरही पैसे काढण्याची मर्यादा कायम

By admin | Published: December 25, 2016 4:54 PM

रोख रकमेचा तुटवडा अजूनही कायम असून, 30 डिसेंबरनंतरही बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा कायम राहणार

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 25 - 8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला आणि देशभरात एकच गोंधळ उडाला. त्यानंतर 50 दिवसांत सर्वकाही ठीक होईल, असं आश्वासन केंद्राकडून देण्यात आलं. मात्र अजूनही बँकांबाहेरच्या रांगा काही कमी होण्याचं नाव घेत नाहीत. बँक आणि एटीएमच्या बाहेर आजही लोक रांगेत उभे दिसत आहेत. बँक आणि एटीएममधून पैसे काढण्याच्या असलेल्या मर्यादेमुळे लोकांना वारंवार रांगेत ताटकळत राहावं लागतं आहे. आतापर्यंत 30 डिसेंबरपर्यंत सर्व परिस्थिती पूर्वपदावर येईल, असं केंद्र सरकारकडून सांगण्यात येत होतं. मात्र रोख रकमेचा तुटवडा अजूनही कायम असून, 30 डिसेंबरनंतरही बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा कायम राहणार आहे. त्यामुळे 30 डिसेंबरनंतरही तुमची एटीएम आणि बँकेच्या लांबच लांब रांगेतून सुटका होण्याची शक्यता धूसर आहे. खरं तर आरबीआयला मागणीनुसार नोटा छापण्यात अडथळे येत आहेत, असं वृत्त बिझनेस स्टॅडर्डनं दिलं आहे. नोटांचे छापखाने सतत सुरू असले तरी आरबीआय बाजारातील चलनाची कमतरता भरू शकत नाही. रोख रकमेच्या तुटवड्यामुळे बँकांनी आरबीआय आणि केंद्र सरकारला रोख रक्कम काढण्याची मर्यादा कायम ठेवण्याची विनंती केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जोपर्यंत मुबलक प्रमाणात नवे चलन बाजारात उपलब्ध होत नाही, तोपर्यंत बँक किंवा एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा कायम ठेवावी, अशी मागणी बँकांनी आरबीआयकडे केली आहे. जर रोख रक्कम काढण्याची मर्यादा संपुष्टात आणली, तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता बँकांनी व्यक्त केली आहे. आतापर्यंत बाजारात 7 लाख कोटी रुपयांचं नवं चलन बाजारात आलं आहे.