जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले असून आता दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी पक्षांची तयारी सुरू आहे. दरम्यान, आता काँग्रेसने पक्षात मोठा बदल केला आहे. ४४ वर्षानंतर काँग्रेसनेजम्मू-काश्मीरमध्ये तरुणाला संधी दिली आहे. काँग्रेसने जम्मू-काश्मीर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष उदय भानू चिब यांची भारतीय युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
श्रीनिवास बीव्ही यांच्या जागी त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. चिब हे सध्या भारतीय युवक काँग्रेसचे सरचिटणीस आहेत. यापूर्वी १९८० मध्ये गुलाम नबी आझाद भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले होते. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भारतीय युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी उदय भानू चिब यांची नियुक्ती केली, असे पक्षाने निवेदन जारी केले आहे.
उदय भानू चिब दुसरे जम्मू- काश्मीरचे दुसरे नेते आहेत. यापूर्वी जम्मू-काश्मीरचे गुलाम नबी आझाद हे युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदय भानू चिब यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
एनएसआयमधून उदय भानू चिब यांनी काम करण्यास सुरुवात केली. नंतर त्यांची जम्मू काश्मीर एनएसयूआयच्या अध्यक्षपदी निवड झाली. काँग्रेसचे काम करताना चिब यांना राष्ट्रीय स्तरावर संघटनेत स्थान मिळाले. पक्षाने त्यांची एनएसयूआयच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती केली. त्यानंतर उदय भानू चिब यांची जम्मू काश्मीर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या पदावर दिर्घकाळ काम केल्यानंतर पक्षाने त्यांना युवक काँग्रेसचे सरचिटणीस केले.
उदय भानू चिब जम्मू उत्तर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. पण पक्षाने या जागेवर काँग्रेसने अजयकुमार साधोत्रा यांना तिकीट दिले.