अयोध्येत सोमवारी (22 जानेवारी) रामलला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पार पडत आहे. अयोध्येतील राम मंदिरात रामलला विराजमान होतील. याप्रसंगी राम मंदिर आंदोलनात सहभागी असलेले लोक अत्यंत भावूक दिसत आहेत. अशीच एक व्यक्ती म्हणजे साध्वी ऋतंभरा (Sadhvi Ritambhara). तीन दशकांपूर्वी जेव्हा राममंदिर आंदोलन सुरू होते, तेव्हा युवा अवस्थेतील साध्वी ऋतंभरा आपल्या भाषणांमुळे अत्यंत लोकप्रीय झाल्या होत्या. आज त्या राम मंदिर उद्घाटन प्रसंगी अत्यंत भावूक होतानाही दिसल्या.
"500 वर्षांच्या संघर्षानंतर विराजित होणार रामलला" -भावूक होत साध्वी ऋतंभरा म्हणाल्या, '500 वर्षांच्या संघर्ष यात्रेनंतर आपले रामलला भव्य मंदिरात विराजमान होत आहेत. मी आपल्याला सांगते की, भारतात असे अनेक लोक आहेत, ज्यांनी या संकल्प पूर्तीसाठी पादत्राणेही घातली नाही, पगडी घातली नाही, काही लोकांनी इतरही अनेक गोष्टी सोडल्या. अनेक महिलांनी आपले केस खुले ठेवले. जेव्हा अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर होईल, तेव्हा आपण संकल्प मुक्त होऊ, असा संकल्प त्यांचा होता.'
त्या पुढे म्हणाल्या, 'आपल्या पीढीला हे सौभाग्य बघण्याची संधी मिळाली आहे, ही गर्वाची गोष्ट आहे. संपूर्ण जगभरातील सनातन मंडळींचे खूप खूप अभिनंदन.' यानंतर त्यांनी, "रामलला का द्वारा, प्राणों से भी प्यारा, एक सभी की मंजिल, एक सभी का नारा"- जय श्रीराम. हे गीतही त्यांनी यावेळी ऐकवले.