अहमदाबाद : पाटीदार (पटेल) समाजाच्या राखीव जागांची मागणी करणारे नेते हार्दिक पटेल (२३) मंगळवारी गुजरातेत परतले. गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पटेल यांना सहा महिने गुजरातबाहेर राहावे लागले. राजस्थानच्या उदयपूरमध्ये त्यांचे वास्तव्य होते. राजस्थानच्या सीमेवरील रतनपूर येथे पटेल यांचे समर्थकांसह आगमन झाल्यावर जोरदार स्वागत करण्यात आले. गुजरातेत दुपारी आगमन होताचपटेल समाजाच्या शेकडो युवकांनी त्यांचे स्वागत केले. तेथून हार्दिक पटेल पटेल समाजाच्या हिंमतनगर (जि. साबरकंठा) येथे होणाऱ्या मेळाव्यात भाषण करण्यासाठी रवाना झाले.स्वागतानंतर बोलताना पटेल यांनी आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्याचा निर्धार केला. महान नेते आणि हुतात्म्यांच्या या महान भूमीपुढे मी नतमस्तक होतो. मी माझ्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच संघर्ष करीन, असे हार्दिक पटेल म्हणाले. (वृत्तसंस्था)
सहा महिन्यांनंतर हार्दिक गुजरातेत परत
By admin | Published: January 18, 2017 5:17 AM