शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

अखेर धुमश्चक्री थांबली

By admin | Published: February 23, 2016 12:39 AM

जम्मू-काश्मीरच्या पाम्पोर येथे एका शासकीय इमारतीत गेल्या तीन दिवसांपासून दडून बसलेल्या तीन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाने खात्मा केला असून यासोबतच गेल्या ४८ तासांपासून सुरू

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पाम्पोर येथे एका शासकीय इमारतीत गेल्या तीन दिवसांपासून दडून बसलेल्या तीन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाने खात्मा केला असून यासोबतच गेल्या ४८ तासांपासून सुरू असलेली चकमक संपली आहे. दरम्यान कुठल्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नसली तरी हे लष्कर-ए-तोयबाचे कृत्य असावे असा अंदाज केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक प्रकाश मिश्रा यांनी वर्तविला आहे.उद्योजकता विकास संस्थेच्या पाच मजली इमारतीत लपून बसलेल्या तीनही दहशतवाद्यांंंना कंठस्नान घालण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी दिली. लष्करी अधिकाऱ्यानेही याला दुजोरा दिला आहे. मृत दहशतवाद्यांजवळून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. ४४ खोल्या असलेल्या या इमारतीत स्फोटके आणि शस्त्रास्त्रांचा शोध अजूनही सुरू आहे. मृत दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. गेल्या शनिवारी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हल्ला केल्यानंतर हे दहशतवादी या इमारतीत लपले होते. या हल्लात दोन जवान शहीद तर एका असिस्टंट कमांडेंटसह १३ जवान जखमी झाले होते आणि त्यानंतर उडालेल्या चकमकीत लष्कराचे दोन कॅप्टन आणि एक लान्सनायकही शहीद झाले. जीओसी १५ कॉर्पचे लेफ्टनंट जनरल एस.के. दुवा यांनी दुपारी इमारत फार मोठी असल्याने मोहिमेस विलंब होऊ शकतो,असे सांगितले होते. रविवारी रात्रभर आणि आज सकाळी थोड्याथोड्या वेळाने गोळीबार सुरू होता. दिवस उजाडताच सुरक्षा दलाने दहशतवाद्यांविरुद्ध तीव्र मोहीम सुरू केली होती. दरम्यान पम्पोर आणि आजूबाजूच्या परिसरात झालेली निदर्शने लक्षात घेता हा संपूर्ण भाग सील करण्यात आला आहे. भुसुरुंग स्फोटात जवान जखमी जम्मू- जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्णात आंतरराष्ट्रीय सीमेवर भुसुरुंग स्फोटात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान जखमी झाला.पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जखमी हेड कॉन्स्टेबल उझान बारा आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत सीमेवर गस्त घालत असताना हा स्फोट झाला. जखमी जवानावर इस्पितळात उपचार सुरू आहेत.दोन शहीद जवानांवर अंत्यसंस्कारजिंद/ जम्मू : काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्णात अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेले २३ वर्षीय कॅप्टन पवनकुमार आणि कॅप्टन तुषार महाजन यांना सोमवारी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.पवनकुमार यांचे पार्थिव हरियाणातील जिंदजवळील बेढाणा या जन्मगावी नेले जात असताना जाट निदर्शकांना मार्ग मोकळा करण्याचे आवाहन लष्कर आणि राज्य सरकारने केले होते. कॅप्टन तुषार महाजन यांचे पार्थिव मूळगावी नेण्यापूर्वी लष्करी अधिकाऱ्यांनी जम्मू येथे पुष्पचक्र अर्पण करीत आदरांजली अर्पण केली. त्यावेळी तुषार यांचे माता-पिता उपस्थित होते. पाच पोलीस जखमीजम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्णात हिमाचल प्रदेशातील एका संशयित गुन्हेगाराच्या समर्थकांनी केलेल्या दगडफेकीत किमान पाच पोलीस जखमी झाले. पोलीस अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार चोरीच्या आरोपातील फरार गुलजार हुसेन याच्या समर्थकांनी ही दगडफेक केली. हिमाचल प्रदेश पोलिसांचे एक पथक त्याला अटक करण्यासाठी सोमवारी येथे आले होते.