अखेर त्या इमारतीवर JCB फिरला, भाजपा आमदाराला महापालिकेची चपराक  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 10:57 AM2019-07-05T10:57:13+5:302019-07-05T11:00:37+5:30

आमदार आकाश विजयवर्गीय हे मध्यप्रदेशचे भाजपचे वरिष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांचे पुत्र आहेत.

After all, JCB moved on the building of madhya pradesh, BJP MLA's slap by the municipality | अखेर त्या इमारतीवर JCB फिरला, भाजपा आमदाराला महापालिकेची चपराक  

अखेर त्या इमारतीवर JCB फिरला, भाजपा आमदाराला महापालिकेची चपराक  

Next

भोपाळ - भाजपाआमदार आकाश विजयवर्गीय यांच्या विरोधानंतर काही काळासाठी थांबलेल्या महापालिका अधिकाऱ्यांनी अखेर ती इमारत उद्धवस्त केली. जुन्या जिर्ण झालेल्या घराला पाडण्यासाठी आलेल्या इंदूर पालिकेच्या अधिकाऱ्याला भाजपचे आमदार आकाश विजयवर्गीय यांनी चक्क बॅटने मारहाण केली होती. त्यानंतर, सोशल मीडियातून आणि माध्यमांतून आमदार आकाश विजयवर्गीय यांच्या गुंडगिरीवरुन मोठी टीका झाली होती. त्यामुळे आकाश यांना अटकही करण्यात आली होती. 

आमदार आकाश विजयवर्गीय हे मध्यप्रदेशचे भाजपचे वरिष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांचे पुत्र आहेत. इंदूर परिसरात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिल्यामुळे, या परिसरातील जुन्या जिर्ण झालेल्या घराला पाडण्यासाठी आलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना आकाश विजयवर्गीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना बेदम मारहाण केली. यादरम्यान स्वतः आकाश हे अधिकाऱ्याला बॅटने मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला  होता. आमदार आकाश विजयवर्गीय यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर, आकाश यांना अटकही झाली होती. मात्र, त्यांना जामीन मंजूर झाला आहे. दरम्यान, महापालिका अधिकाऱ्यांनी अखेर आज त्या जीर्ण झालेल्या इमारतीवर जेसीबी फिरवला. तसेच परिसरातील जीर्ण झालेली इमारतही पूर्णपणे उद्धवस्त केली. 


प्रकरण काय?
जुन्या जिर्ण झालेल्या घरांना तोडण्यासाठी अधिकारी आल्यावर स्थानिकांनी आकाश यांना बोलावले. त्यानंतर अधिकारी आणि आकाश यांच्यात घर पाडण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला. त्यानंतर आकाश यांच्या कार्यकर्त्यांनी जेसीबीची चावी काढून घेतली. तुम्हाला १० मिनटांचा वेळ देतो येथून निघून जा नाहीतर जे होईल त्याची जबाबदारी तुमची असेल, अशी धमकी आकाश यांनी अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर आकाश यांनी बॅटने अधिकाऱ्यांना मारणे सुरू केले. यावेळी पोलिस आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कसे-बसे अधिकाऱ्याला तेथून बाहेर काढले.

Web Title: After all, JCB moved on the building of madhya pradesh, BJP MLA's slap by the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.