अखेर नशिराबादला एमआयडीसीचे पाणी
By admin | Published: February 09, 2016 12:18 AM
नशिराबाद : गेल्या दीड महिन्यापासून पाणी टंचाईने हैराण असलेल्या नशिराबादकरांना अखेर एमआयडीसीचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. यामुळे आठ ते दहा दिवसानंतर मिळणारे पाणी आता चौथ्या-पाचव्या दिवशी मिळू शकेल.
नशिराबाद : गेल्या दीड महिन्यापासून पाणी टंचाईने हैराण असलेल्या नशिराबादकरांना अखेर एमआयडीसीचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. यामुळे आठ ते दहा दिवसानंतर मिळणारे पाणी आता चौथ्या-पाचव्या दिवशी मिळू शकेल.पाणी योजनाच कार्यन्वीत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. एमआयडीसीचे पाणी मिळावे म्हणून सरपंच लालचंद पाटील, योगेश पाटील यांनी पालकमंत्री एकनाथराव खडसे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर संबंधित अधिकार्यांशी दूरध्वनीवर सूचना दिल्यानंतर एमआयडीसीचे पाणी जोडून गावाला पुरवठा करण्यात आला आहे. बेळी, मुर्दापूर व एमआयडीसीचे पाणी एकत्र करुन गावाला पाणीपुरवठा होत आहे. वाघूर धरणातून मिळणार आवर्तन....पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वाघूर धरणाच्या डाव्या कालव्यातून पाण्याचे आवर्तन सोडावे यासाठी गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामपंचायतने मागणी केली व संबंधित विभागाला निवेदन दिले होते. गिरीश महाजन व जिल्हाधिकार्यांची चर्चा होऊन पाणी सोडण्याबाबत सहमती दर्शविली. या बाबत संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या असून ग्रामपंचायत बंधारा टाकून पाणीटंचाई निवारार्थ युद्ध पातळीवर कामाला लागल्याची माहिती उपसरपंच किर्तीकांत चौबे, सदस्य लालचंद पाटील यांनी दिली. यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे.