नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. खरं तर बंगळुरूच्या विजय नगर परिसरातील दुचाकीस्वाराच्या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला. दरम्यान, होसाहल्ली मेट्रो स्टेशनजवळ एका दुचाकीस्वाराने चारचाकीला धडक दिली. दुचाकीस्वार चुकीच्या बाजूने येत होता. म्हणून कार चालकाने दुचाकी थांबविण्याचा प्रयत्न केला असता आरोपी दुचाकीस्वाराने चारचाकीच्या चालकाला फरफटत नेले. लक्षणीय बाब म्हणजे कार चालकाने दुचाकीच्या मागे 100 मीटरपर्यंत फरफटत प्रवास केला. तेवढ्यात रस्त्यावरील वाहनधारकांनी आरोपी दुचाकी चालकाला थांबवले. याप्रकरणी गोविंद राज नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल वृत्तसंस्था एएनआयने या घटनेचा व्हिडीओ शेअर केला असून पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. बंगळुरू पश्चिमचे डीसीपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मगदी रोडवर एका व्यक्तीला स्कूटरच्या मागे फरफटत नेल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. पीडित व्यक्तीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. स्कूटी चालवणाऱ्या व्यक्तीला गोविंदराज नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत असल्याचे डीसीपी यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"