दिल्लीचे मुख्यंत्री तथा आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात गुरुवारी अटक करण्यात आली आहे. ईडीने गुरुवारी 10वे समन बजावत केजरीवाल यांना अटक केली. त्यांच्या अटकेनंतर त्यांचे जुने सहकारी आम आदमी पार्टीचे माजी नेते तथा कवी कुमार विश्वास यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यंच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू आहे.
कुमार विश्वा यांची पोस्ट - केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर, कुमार विश्वास यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X)वर "कर्म प्रधान विश्व रचि राखा। जो जस करहि सो तस फल चाखा॥" या गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानसच्या ओळी पोस्ट केल्या आहेत. या चौपाईच्या माध्यममाने गोस्वामी तुलसीदास कर्माचे महत्व विशद करतात. "हे विश्व कर्म प्रधान आहे, जी व्यक्ती जसे करते, तिला तसे फळ मिळते." असा या चौपाईचा अर्थ आहे. या ओळींच्या माध्यमाने कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून निशाणा साधल्याचे बोलले जात आहे. कुमार विश्वास आणि अरविंद केजरीवाल हे अन्ना आंदोलनातील सहकारीही होते.
केजरीवालांना केव्हा-केव्हा पाठवलं गेलं समन - - पहिले 02 नोव्हेंबर, 2023- दुसरे 18 डिसेंबर, 2023- तिसरे 03 जेनेवारी, 2024- चौथे 18 जानेवारी, 2024- पाचवे 02 फेब्रुवारी, 2024- सहावे 19 फेब्रुवारी, 2024- सातवे 26 फेब्रुवारी, 2024- आठवे 04 मार्च 2024- नववे 17 मार्च 2024
केजरीवाल असे अडकले -मनीष सिसोदिया यांच्या जामिनासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना, या प्रकरणी आपण संपूर्ण पक्ष अथवा पक्षाच्या प्रमुखांनाही समन पाठवणार का? असा प्रश्न न्ययालयाने ईडीला विचारला होता. यावर, विचार करू, असे सॉलिसिटर जनरल यांनी म्हटले होते. यानंतर, ईडीने अरविंद केजरीवाल यांना पहिले समन पाठवले होते. दिल्ली अबकारी नीती प्रकरणाशी अरविंद केजरीवाल यांचा संबंध होता, असा ईडीचा आरोप आहे. ईडीच्या मते, मद्य नीती लागू करण्यात कथित भ्रष्टाचार झाला आहे. जो 338 कोटी रुपयांचा असल्याचे बोलले जात आहे.