नोटाबंदीनंतर कमिशन घेऊन बदली केल्या जात होत्या जुन्या नोटा; काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 06:02 AM2019-04-18T06:02:19+5:302019-04-18T06:02:49+5:30

नोटाबंदीचा निर्णय लागू झाल्यानंतर हजार व पाचशेच्या जुन्या नोटा बदलण्याचा देशभरात जो खेळ झाला त्यातील गैरप्रकार आता उजेडात येत आहेत.

After the blockade, the commission was replaced with old notes; Congress allegations | नोटाबंदीनंतर कमिशन घेऊन बदली केल्या जात होत्या जुन्या नोटा; काँग्रेसचा आरोप

नोटाबंदीनंतर कमिशन घेऊन बदली केल्या जात होत्या जुन्या नोटा; काँग्रेसचा आरोप

Next

- शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : नोटाबंदीचा निर्णय लागू झाल्यानंतर हजार व पाचशेच्या जुन्या नोटा बदलण्याचा देशभरात जो खेळ झाला त्यातील गैरप्रकार आता उजेडात येत आहेत. अशा नोटांच्या अदलाबदलीमध्ये संशयास्पद व्यवहार केल्याबद्दल कॅबिनेट सचिवालयात पाच वर्षे सेवा बजावलेल्या कॉन्स्टेबल पदावरील राहुल रथरेकर यांना जून २०१७मध्ये सेवेतून दूर करण्यात आले होते असे या सचिवालयाच्या एका निवेदनातच म्हटले आहे.
या गोष्टीमुळे खळबळ माजली आहे. नोटाबंदीसंदर्भातकाँग्रेसने ९ एप्रिल रोजी जारी केलेल्या एका व्हिडिओमध्ये हेच राहुल रथरेकर सर्वांना दिसले होते. बंदी घातलेल्या जुन्या नोटा बदलून देण्याच्या कामात देशातील २६ ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते व निकटवर्तीय, सरकारी कर्मचारी, बँक अधिकारी यांच्या संगनमताने गैरप्रकार घडले होते हे सिद्ध करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला होता. स्टिंग आॅपरेशन करून हा व्हिडीओ बनविण्यात आला होता.
भाजपचे गुजरातमधील कार्यालय व त्या पक्षाशी संबंधित लोक हे नोटा अदलाबदलीचा व्यवसाय करत असल्याचे काँग्रेसने २६ मार्च रोजी झळकविलेल्या एका व्हिडिओमध्ये दाखविण्यात आले होते. काँग्रेसने बुधवारी आणखी एक व्हिडिओ जारी केला असून त्यात काही धक्कादायक गोष्टी दाखविण्यात आल्या आहेत. आकाशी रंगाचे जाकिट घातलेला व भाजपशी संबंधित असलेली एक व्यक्ती त्या पक्षाच्या कार्यालयातून बाहेर येऊन स्वत:च्या कार्यालयात जाते. याचवेळी जाकिट घातलेल्या व्यक्तीला भाजप मुख्यालयातून दूरध्वनी येतो. जाकिटधारी समोरच्याला सांगतो की, विशिष्ट कमिशन दिल्यास तुमच्याकडे असलेल्या पाचशे, हजारच्या बंदी घातलेल्या नोटा बदलून त्याबदल्यात तितक्याच किमतीच्या दोन हजार रुपयांच्या नोटा देऊ. एका खोलीत २ हजार रुपयांच्या बंडलांचा ढीग रचला असल्याचे दृश्यही या व्हिडिओत पाहायला मिळते. ती ५० हजार कोटी रुपयांची रोख रक्कम असावी.
हा मुद्दा काँग्रेसने पूर्वीच उपस्थित केला असला तरी राहुल रथरेकर यांच्याबाबतच्या कॅबिनेट सचिवालयाच्या निवेदनामुळे या पक्षाने भाजपवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. या अनुषंगाने काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी मोदी सरकारला आठ प्रश्न विचारले असून त्याची उत्तरे द्यावीत अशी मागणीही केली आहे.
सिब्बल यांनी म्हटले आहे की, नोटाबंदीचा निर्णय लागू झाल्यानंतर जुन्या नोटांची अवैधरित्या अदलाबदली करणाऱ्यांवर गुन्हे का नोंदविण्यात आले नाहीत? भाजपचे गुजरात मुख्यालय कमलम व नोटांचा साठा करणाऱ्यांमध्ये नेमके काय व्यवहार झाले यावर उजेड पडला पाहिजे. एका हॉटेलच्या रुममध्ये जुन्या नोटा मोजत बसलेल्या व्यक्तींची नावे उघड करावीत अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

Web Title: After the blockade, the commission was replaced with old notes; Congress allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.