शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
5
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
6
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
7
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
8
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
9
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
10
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
11
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
12
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
13
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
14
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
15
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
16
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
17
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
18
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
20
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात

माघार नाही...; रक्त गोठवणारी थंडी अन् सीमेवरील तणावातही जवानांनी गलवान नदीवर तयार केला पूल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 5:52 PM

चीनबरोबर जबरदस्त तणाव असतानाच, भारतीय लष्कराच्या वीर जवानांनी 60 मीटर लांब असलेला हा पूल गुरुवारी सायंकाळपर्यंत पूर्ण केला. एवढेच नाही, तर लष्कराने 2 तास त्यावर वाहने चालवून त्याचे परीक्षणही केले.

ठळक मुद्देभारतीय लष्कराच्या वीर जवानांनी 60 मीटर लांब असलेला हा पूल गुरुवारी सायंकाळपर्यंत पूर्ण केला.लष्कराने 2 तास या पुलावर वाहने चालवून त्याचे परीक्षणही केले. या पुलामुळे आता भारतीय जवानांना LACपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे.

नवी दिल्ली : लडाखमधील प्रत्यक्ष सीमा रेषेवर (LAC) चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झटापटीनंतरही भारतीय लष्कर ठामपणे सीमेवर उभे आहे. या झटापटीनंतर सीमेवर प्रचंड तणाव निर्माण झालेला असतानाही लष्कराच्या एका युनिटने गलवान खोऱ्यात एका पुलाचे काम सुरूच ठेवले. सांगण्यात येते, की लष्कराच्या याच कामावरून गलवान खोऱ्यात दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, 15 जूनला झालेल्या हिंसक झटापटीनंतर काही तासांतच भारतीय लष्कराच्या लढवय्या जवानांनी गलवान नदीवर पुलाचे काम पूर्ण केले आहे. लष्करातील अभियंत्यांना हे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट

60 मीटर लांब आहे पूल -चीनबरोबर जबरदस्त तणाव असतानाच, भारतीय लष्कराच्या वीर जवानांनी 60 मीटर लांब असलेला हा पूल गुरुवारी सायंकाळपर्यंत पूर्ण केला. एवढेच नाही, तर लष्कराने 2 तास त्यावर वाहने चालवून त्याचे परीक्षणही केले. या पुलामुळे आता भारतीय जवानांना LACपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे.

India China Face Off : सुखोई ते मिराज, चीनचा सामना करण्यासाठी भारतानं तैनात केली शक्तीशाली लढाऊ विमानं

भारतीय जवान आणि चीनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर, लगेचच मंगळवारी सकाळी लष्कराच्या कारू बेस्ड डिव्हिजनने, कुठल्याही प्रकारचा विलंब न करता पुलाचे काम वेगात करा, असा संदेश अभियंता डिव्हिजनला पाठवला होता. 'बेली ब्रिज' अर्थात हा एक प्रकारचा पोर्टेबल पूल आहे. यामुळे लष्कराच्या सर्व प्रकारच्या वाहनांना सहज पणे ये-जा करणे सोपे येईल.

India and china standoff : 'ते अडीच हजार अन् आम्ही फक्त 300...', जखमी जवानाने वडिलांना सांगितला 'त्या' रात्रीचा थरार सोमवारी रात्री झालेल्या घटनेसारख्याच घटा पुन्हा होऊ शकतात, अशी शंका असल्याने स्थानीक कमांडर्सनी हा पूल लवकरात लवकर तयार करण्याचे निर्देश दिले होते. जेने करून भारतीय सैन्याला मदत होईल. या पुलापासून घटनास्थळ केवळ काही किलो मीटर अंतरावर आहे.

India and china standoff : भारतीय लष्कराने करार तोडला, सैनिकांवर केला हल्ला; आता चीन करतोय भलताच दावा!

भारत चीन वाद सुरू असतानाच पुलाचे काम करत असलेल्या अभियंत्यांना संरक्षण देण्यासाठी इंफन्ट्री युनिटला निर्देश देण्यात आले होते. अशा प्रकारे लष्कराच्या अभियंत्यांनी रक्तही गोठेल, एवढ्या थंडीतसुद्धा मंगळवारी आणि बुधवारी रात्रीही आपले काम सुरूच ठेवले आणि पुलाचे काम पूर्ण केले. 

टॅग्स :border disputeसीमा वादBorderसीमारेषाchinaचीनIndian Armyभारतीय जवान