शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

अ‍ॅप्स, कॉन्ट्रॅक्ट्सनंतर चीनला आणखी एक मोठा झटका देण्याची तयारी, आता 'या' विद्यापीठांवर सरकारची नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2020 1:48 PM

कन्फ्यूशिअस संस्थांना थेट चिनी भाषा आणि चिनी संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने चिनी शिक्षण मंत्रालयाकडून अर्थसहाय्या केले जाते. अशा पद्धतीच्या प्रचार-प्रसारासंदर्भात अमेरिका आणि इंग्लंड यांच्यासह जगभरातून चीनवर टीका होत राहिली आहे. 

ठळक मुद्देआता सरकारची नजर, चीनशी संबंध असणारी महाविद्यालये आणि विद्यापीठांवर आहे.कन्फ्यूशिअस संस्थांना थेट चिनी भाषा आणि चिनी संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने चिनी शिक्षण मंत्रालयाकडून अर्थसहाय्या केले जाते.जेएनयू आणि पेकिंग युनिव्हर्सिटी यांच्यात 2005 मध्येच एमओयू झाला होता.

नवी दिल्ली - सीमा प्रश्नावरून भारत-चीन यांच्यात तणावाचे वातावरण आहे. हा वाद सुरू झाल्यानतंर भारत सरकारने अनेक चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली. एवढेच नाही, तर चिनी कंपन्यांना देण्यात आलेले अनेक कॉन्ट्रॅक्ट्सदेखील सरकारने रद्द केले आहेत. यानंतर आता सरकारची नजर, चीनशी संबंध असणारी महाविद्यालये आणि विद्यापीठांवर आहे. उच्च शिक्षणात कन्फ्यूशिअस संस्थांमुळे चीनचा प्रभाव वाढत आहे. यासंदर्भात संरक्षण संस्थांनी सतर्क केल्यानतंर शिक्षण विभागाकडून सात महाविद्यालये आणि विद्यापीठांची समीक्षा करण्यात येणार आहे. 

शिक्षण मंत्रालयाने आयआयटी, बीएचयू, जेएनयू, एनआयटी आणि चिनी संस्थांसह काही नामवंत शैक्षिक संस्था यांच्यात झालेल्या 54 सामंजस्य करारांची (एमओयू) समीक्षा करण्याचेही ठरवले आहे. यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) यांनाही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

कन्फ्यूशिअस संस्थांना थेट चिनी भाषा आणि चिनी संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने चिनी शिक्षण मंत्रालयाकडून अर्थसहाय्या केले जाते. अशा पद्धतीच्या प्रचार-प्रसारासंदर्भात अमेरिका आणि इंग्लंड यांच्यासह जगभरातून चीनवर टीका होत राहिली आहे. 

चीनने अक्साई चीनमध्ये 50 हजारहून अधिक सैनिक, टँक्स, क्षेपणास्त्रे आणि तोफांसह भारतासमोर शक्ती प्रदर्शन केले. याशिवाय, चीनने एलएसीवर उत्तराखंड आणि अरुणाचलला लागून असलेल्या भागातही मोठ्या प्रमाणावर सैन्य वाढवले आहे. असे असताना भारताने कन्फ्यूशिअस संस्था आणि एमओयूची समीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे.

या संस्थांचा समावेश -सरकारमधील वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात ज्या कन्फयूशिअस संस्थांची समीक्षा करण्यात येणार आहे, त्यात मुंबई विद्यापीठ, वेल्लोर तंत्रशिक्षण संस्था, लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (जालंधर), ओ. पी. जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटी (सोनीपत), स्कूल ऑफ चायनीज लँग्वेज (कोलकाता), भारथिअर युनिव्हर्सिटी (कोयंबतूर) केआर मंगलम युनिव्हर्सिटी ( गुरुग्राम) यांचा समावेश आहे. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर अधिकाऱ्यांनी सांगितले, की दिल्लीतील जवाहर लाल नेहरू युनिव्हर्सिटीचाही हनबनसोबत एमओयू आहे.

जेएनयूचे सेंटर फॉर चायनीज अँड साउथ ईस्ट एशियन स्टडीजचे प्रमूख बीआर दीपक यांनी सांगितले, की जेएनयू आणि पेकिंग युनिव्हर्सिटी यांच्यात 2005 मध्येच एमओयू झाला होता. मात्र मंडळाच्या स्थापनेसंदर्भात असहमती झाल्याने संस्थेची स्थापना होऊच शकली नाही. कारण हा एमओयू पाचच वर्षांचा होता. तो आता संपला आहे. मात्र, तो पुन्हा करण्याची चीनी अधिकाऱ्यांची इच्छा आहे. मात्र आता विद्यापीठाने यात फारसा रस घेतलेला नाही.'

महत्त्वाच्या बातम्या -

तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...

शुक्रिया मोदी भैया : मुस्लीम महिलांनी पंतप्रधान मोदींच्या फोटोला बांधली राखी, 'या'साठी मानले आभार

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

15 ऑगस्ट : सरकारचा मोठा निर्णय, लष्करी अधिकारी समारंभापर्यंत क्वारंटाइन

युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...

टॅग्स :border disputeसीमा वादchinaचीनladakhलडाखIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीuniversityविद्यापीठCentral Governmentकेंद्र सरकार