शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

३२ पायऱ्या चढल्यानंतर श्रीरामललाचे होणार दर्शन;जटायू मूर्ती, यज्ञ मंडप भाविकांचे लक्ष वेधणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 8:32 AM

श्रीरामांची जन्मभूमी अयाेध्या येथे भव्य श्रीराम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आहे.

अयाेध्या- श्रीरामांची जन्मभूमी अयाेध्या येथे भव्य श्रीराम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आहे. या ठिकाणी केवळ मुख्य मंदिर, इतर अनेक बांधकाम हाेत आहेत. मुख्य मंदिराशिवाय आजूबाजूचा परिसर, तीर्थक्षेत्राचा विकास इत्यादी अनेक गाेष्टी अयाेध्येत हाेत आहेत. ७० एकर एवढ्या विस्तीर्ण परिसरात संग्रहालय, सभागृह, जटायू मूर्ती, यज्ञ मंडप, औषधी वनस्पतींचे उद्यान इत्यादी अनेक गाेष्टी भाविकांचे लक्ष वेधून घेतील. मंदिराच्या ३२ पायऱ्या चढल्यानंतर श्रीरामललाचे दर्शन हाेणार आहे. 

श्रीराम मंदिराच्या परिसरात कायकाय आहे?

  • ७० एकर एकूण परिसर.
  • राम मंदिरात एकूण ५ शिखर आणि १४ द्वार. 
  • २.७ एकर जागेत मुख्य मंदिर बांधण्यात येत आहे.
  • ५.७४ लाख चाैरस फूट एवढे मंदिराचे एकूण बांधकामक्षेत्र आहे.
  • तीन मजले असतील. प्रत्येक तळाची उंची २० फूट राहणार आहे.
  • तळमजल्यावर १६० स्तंभ, पहिल्या माळ्यावर १३२ 
  • आणि दुसऱ्या माळ्यावर ७४ स्तंभ राहणार आहेत.
  • श्रीरामलल्लांचे पुराणकालिक दर्शनमंडळ प्रकल्पात जन्मभूमी संग्रहालय राहणार आहे. 
  • उत्खननात आढळलेले शिलालेख, पुरातन अवशेष इत्यादी वस्तू ठेवण्यात येतील.
  • गुरू वशिष्ठ पीठिकेत वेद, पुराण, रामायण आणि संस्कृत अध्ययन आणि संशाेधन क्षेत्र राहणार आहे.
  • श्रीराम मंदिरासाठी झालेल्या आंदाेलनात प्राण गमाविलेल्यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारकही उभारण्यात येणार आहे.
  • २५ हजार लाेकांसाठी मंदिर परिसरात लाॅकरची सुविधा उपलब्ध राहणार आहे.
  • मंदिर परिसराच्या दाेन बाजूंनी अग्निशमन केंद्र राहणार आहेत.
  • भाविकांना आराेग्य सेवेची गरज भासल्यास जवळच एक रुग्णालयदेखील उभारण्यात येणार आहे.

यांचीही मंदिरे बांधणारमंदिराभाेवती आयताकृती तटबंदी आहे. तटबंदीच्या चारही काेपऱ्यात श्रीगणेश, महादेव, देवी भगवती, सूर्य यांच्यासह महर्षी वाल्मीकी, वशिष्ठ, विश्वामित्र, अगस्त्य, निशादराज, माता शबरी आणि देवी अहिल्या यांची मंदिरे बांधण्यात येणार आहेत.

या दिशेने हाेणार प्रवेश, या दिशेने पडाल बाहेरमंदिरात पूर्व दिशेकडून भाविक प्रवेश करतील. दर्शन केल्यानंतर दक्षिण दिशेकडून भाविक बाहेर पडतील. मंदिर परिसरात एकूण ४४ दरवाजे आहेत.

तळमजल्याचे काम पूर्णजमिनीच्या उत्तरेकडील भागात तीन मजली मंदिर बांधण्यात येत आहे. तळमजल्याचे बांधकाम पूर्ण झाले असून पहिल्या मजल्याचे काम सुरू आहे, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली.

शरयू नदीत जाणार नाही मंदिरातील सांडपाणीमंदिर परिसरात दाेन स्वतंत्र सांडपाणी प्रक्रिया केंद्र राहणार आहेत. मंदिरातून बाहेर निघणारे पाणी शरयू नदीत जाणार नाही. मंदिरातच त्यावर प्रक्रिया करण्यात येईल. याशिवाय मंदिरासाठी पिण्याचे पाणी आणि वीजजाेडणीदेखील वेगळी राहणार आहे.

२२ लाख घनफूट दगडाचा वापर

मंदिराच्या निर्मितीसाठी २१ ते २२ लाख घनफूट दगडांचा वापर केला आहे. त्यात सुमारे ५ लाख घनफूट एवढा गुलाबी दगड वापरला आहे. गाभारा मकराना संगमरमरी दगडाचा बनविला आहे. कर्नाटक आणि तेलंगणा येथून १७ हजार ग्रेनाइटचे ब्लाॅक्सदेखील वापरण्यात येत आहेत.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या