भोपाळ - मध्यप्रेदाशातील भोपाळच्या (Bhopal) खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर (MP Pragya Singh Thakur) यांची प्रकृती अचानक खालावली आहे. त्यांना स्टेट प्लेनने उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले. प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. यानंतर त्यांना मुंबईला हलविण्यात आले. (After complained of problem in breathing Bhopal MP Pragya Singh Thakur taken to mumbai)
प्रज्ञा ठाकूर यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. त्यांना शनिवारी दुपारच्या सुमारास श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला.
"तुम्ही मतं देऊन नेत्यांना विकत घेत नाही"; भरसभेत प्रज्ञा सिंह ठाकूर संतापल्या
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बैठकांवर बैठका घेत होत्या प्रज्ञा सिंह -गेल्या महिन्यातही प्रज्ञा सींह यांची प्रकृती खालावली होती. त्यावेळीही त्यांना रुग्णालायत दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्या सातत्याने बैठकांवर बैठका घेत होत्या. त्यांना आजही दिशा समितीच्या जिल्हा पंचायत कार्यालयात आयोजित एका बैठकीत सहभागी व्हायचे होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांची प्रकृती खालावली.
दररोज पाच वेळा हनुमान चालीसा म्हणा, कोरोना बरा होईल - भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर
डिसेंबर महिन्यात दिल्ली येथील एम्समध्ये करण्यात आले होते दाखल -खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात दिल्ली येथील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळीही त्यांनी श्वसाचा आणि उच्च रक्तदाबाचा त्रास झाला होता. यानंतर केलेल्या कोरोना चाचणीत त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. याशिवाय गेल्या जून महिन्यातही एका कार्यक्रमावेळी त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. कार्यक्रमावेळी त्या अचानक बेशुद्ध झाल्या होत्या.प्रज्ञा ठाकूर या 2019च्या लोकसभा निवडणुकीत भोपालमधून निवडणून आल्या आहेत. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांचा पराभव केला होता.